जपानी बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते यापूर्वी खरी ठर

जपानी बाबा वांगाचे भाकित खरे ठरले? 1999 मध्येच दिला होता त्सुनामीचा इशारा

Baba Vanga

Japanese Baba Vanga Predictions: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात बुधवारी पहाटे तब्बल 8.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. या भूकंपामुळे जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. तसेच भूकंपामुळे समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. जपान सरकारने त्वरित सावधतेचा उपाय करत नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. परंतु या घटनेची सर्वात चर्चिलेली बाब म्हणजे 26 वर्षांपूर्वी, 1999 मध्ये प्रसिद्ध जपानी कलाकार रियो तात्सुकी (ज्यांना 'जपानी बाबा वांगा' म्हणतात) यांनी आपल्या Future Eye Saw या पुस्तकात या संकटाची भविष्यवाणी केल्याचा दावा सोशल मीडियावर होत आहे. नेटिझन्सच्या मते, त्यांनी रशियात भयंकर भूकंप आणि त्यानंतर जपानला त्सुनामीचा धोका याची आधीच कल्पना दिली होती. आता त्यांनी केलेले भाकित खरे ठरले आहे, असा दावा अनेकांनी केला आहे. 

हेही वाचा 2025 मध्ये जगावर ओढावणार मोठं आर्थिक संकट! बाबा वांगाचे भाकीत खरे ठरले का?

जपानी बाबा वेंगा यांनी केली होती कोविड-19 ची भविष्यवाणी - 

जपानी बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. जपानी बाबांनी सांगितले की त्यांनी कोविड-19 ची भविष्यवाणी केली होती, जी 2020 मध्ये खरी ठरली आहे. कोविडने जगभरात कहर केला होता. या विषाणूमुळे आशिया आणि युरोपातील देशांमध्ये कोविडमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या धोकादायक विषाणूने सुमारे 2 वर्षे लोकांचे जीवन थांबवले होते.

हेही वाचा - जुलै 2025 साठी बाबा वेंगांनी केली होती धक्कादायक भविष्यवाणी; 

राजकुमारी डायनाच्या मृत्यूचीही भविष्यवाणी - 

जपानी बाबांनी 1995 मध्ये कोबे भूकंप, फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू, राजकुमारी डायनाचा रस्ते अपघातात मृत्यू अशी भाकिते भाकिते केली होती. नंतर ही सर्व भाकिते खरी ठरली. जपानी बाबा वेंगा यांचा दावा आहे की 2030 मध्ये कोविडपेक्षाही घातक विषाणू संपूर्ण जगावर हल्ला करेल. हा विषाणू पूर्वीपेक्षा जास्त नुकसान करेल.