या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज

Uttarkashi Cloudburst Viral Video: भयानक आपत्तीत चमत्कार! ढगफुटीच्या घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ आला समोर

Uttarkashi Cloudburst Viral Video: उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यातील धराली गावावर मंगळवारी भीषण ढगफुटी झाली, ज्यामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर येताना दिसत आहे. हा प्रसंग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले असून काहींनी याला 'निसर्गाचा चमत्कार' म्हटले आहे.

ढगफूटीमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त -

ढगफुटीमुळे डोंगराळ भागावरून आलेले दगड, झाडे, माती आणि पाणी यामुळे धराली गावातील घरे, दुकाने आणि रस्ते वाहून गेले. हवामान खात्यानुसार, खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीमुळे पूर आला. यात 50 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले असावेत, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 4 मृतदेह सापडले असून शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत.

हेही वाचा - Cloudburst Hits Sukhi Village: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप! धरालीनंतर सुखी गावातही ढगफुटी

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू - 

घटनेनंतर तात्काळ एसडीआरएफ, एनडीआरएफ, ITBP, लष्कर, पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, कठीण भूप्रदेश आणि हवामानामुळे अडचणी येत आहेत.

ढगफुटीच्या घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ - 

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक - 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मदत कार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (वरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची ‘जय महाराष्ट्र’ पुष्टी करत नाही.)