मुंबई शहराला स्वप्नांचे शहर असे देखील म्हटले जाते.

Haunted Places In Mumbai: मुंबईतील 'ही' आहेत सर्वात हॉंटेड ठिकाणं

ज्याप्रमाणे जगात चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे जगात वाईट किंवा भयानक गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. जगात असे अनेक ठिकाण आहेत जे सध्या पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले. त्याचे कारण म्हणजे तिथे असलेल्या भुतांच्या वावरामुळे. जे आपण कधीच नाकारू शकत नाही. भारतात असे अनेक ठिकाण आहेत. त्यापैकीच एक शहर म्हणजे मुंबई. या शहराला स्वप्नांचे शहर असे देखील म्हटले जाते. मात्र स्वप्नांच्या या शहरात असे अनेक ठिकाण आहेत, ज्या आजही भुताने झपाटलेल्या आहेत. मात्र आताच्या 21 व्या शतकात भूत - प्रेत किंवा यासारख्या नकारात्मक गोष्टींवर कोणीही विश्वास ठेऊ शकत नाही. मात्र काही लोकांनी भुताटकी गोष्टींना जवळून पाहिले आहे. त्यांच्या मते, अश्या अनेक गोष्टी आपल्या अवती-भवती असतात. ज्या आपल्याला साहसा दिसत नाहीत. चला तर जाणून घेऊया मुंबईतील असे कोणते ठिकाण आहेत, जिथे आजही जाण्यास लोकं घाबरतात. 

हेही वाचा: उड्डाणपुलावरून पाडला नोटांचा पाऊस, पैसे पकडायला लोक धावले; चमत्कारिक प्रकाराचं कारण जाणून डोक्याला हात लावाल..

1 - मुकेश मिल्स - कुलाबा:

मुकेश मिल्स हे ठिकाण मुंबईतील कुलाबाजवळ आहे. हे ठिकाण श्रापित म्हणून ओळखले जाते. अनेक दशकांपूर्वी मुकेश मिल्समध्ये आग लागली होती. ज्यात अनेकजण मरण पावले. तेव्हापासून हे ठिकाण हॉंटेड आहे. या ठिकाणी वॉन्टेड, सडक, अश्या अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहेत. शूटिंगदरम्यान कलाकार, दिग्दर्शक आणि कर्मचाऱ्यांना इथे अनेक भयानक आवाजदेखील ऐकायला मिळाले. 11 एकरमध्ये पसरलेला मुकेश मिल्सचा परिसर देशातील सर्वात हॉंटेड ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. 

2 - ​डिसूजा चाळ - माहीम:

डिसूजा चाळ मुंबईतील माहीममध्ये असून हे ठिकाण श्रापित आहे. इथल्या स्थानिक रहिवाश्यांनुसार, काही दशकांपूर्वी इथे असलेल्या एका विहिरीमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच हे ठिकाण श्रापित म्हणून ओळखले जाते. तिच्या मृत्यूनंतर इथे अनेक भयानक गोष्टी घडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येतील रहिवाशी संध्याकाळनंतर घराच्या बाहेर जाणे टाळतात. 

3 - टॉवर ऑफ सायलेंस:

टॉवर ऑफ सायलेंस ठिकाण मुंबईतील मलबार हिल्समध्ये आहे. हे ठिकाण त्याच्या अलौकिक घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. पारशी समाजातील लोक येथील ठिकाणाचे उपयोग दफनभूमी साठी करतात. मृत्यूनंतर त्या देहाला टॉवर ऑफ सायलेंसमध्ये ठेवतात. जिथे मृत्यूनंतर लोकांचे मृतदेह खाण्यासाठी अनेक मांसाहारी पक्षी येतात.