या डोअरमॅटवर केवळ भगवान जगन्नाथाचा चेहरा छापलेला न

हिंदू भावनांशी छेडछाड! चीनच्या अलीएक्सप्रेसने पायपुसणीवर छापला भगवान जगन्नाथाचा फोटो

Lord Jagannath doormat controversy

Lord Jagannath Doormat Controversy: चीनच्या मालकीच्या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म AliExpress वर भगवान जगन्नाथाची प्रतिमा असलेला डोअरमॅट विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या या घटनेवर देशभरातून तसेच ओडिसामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. येथील लोक भगवान जगन्नाथ अत्यंत पूजनीय देवता मानतात. या डोअरमॅटवर केवळ भगवान जगन्नाथाचा चेहरा छापलेला नाही, तर उत्पादनाच्या जाहिरातीत त्यावर पाय ठेवलेली प्रतिमा देखील दाखवली गेली आहे. AliExpress ने या वस्तूचे वर्णन 'ओलावा शोषक' आणि 'अँटी-स्लिप' असे केले आहे, ज्यामुळे भाविकांचा संताप आणखी वाढला आहे. 

धार्मिक असंवेदनशीलतेचे गंभीर उदाहरण - 

श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य माधब पूजापांडा यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ओडिशा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना तात्काळ हस्तक्षेप करून चीन सरकारकडे राजनैतिक पातळीवर निषेध नोंदवण्याचे आवाहन केले आहे. पूजापांडा यांनी म्हटलं आहे की, 'ही एक वेगळी घटना नाही. 'महाप्रसाद' आणि 'पतितपावन बाणा' यासारख्या पवित्र जगन्नाथाशी संबंधित शब्दांचा गैरवापर नफ्यासाठी होत असल्याची प्रकरणे वाढत आहेत. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.' 

हेही वाचा - भूकंपाच्या हादऱ्यांनाही हरवता आलं नाही डॉक्टरांचं धैर्य! रशियन डॉक्टरांचा धाडसी व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून संताप -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील भाविकांनी या उत्पादनाचा निषेध केला आहे. सध्या #RespectJagannath आणि #BoycottAliExpress सारखे हॅशटॅग भारतात ट्रेंड होत आहेत. हजारो भाविकांनी AliExpress कडून जाहीर माफी आणि उत्पादन हटवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन सरकारचा मोठा निर्णय! मुलांना YouTube वापरण्यास बंदी

धार्मिक प्रतीकांचे बौद्धिक संपदा संरक्षण - 

गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदू गट जगन्नाथ परंपरेच्या प्रतीकांचे पेटंट व ट्रेडमार्कद्वारे संरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, जर योग्य कायदेशीर अंमलबजावणी वेळेत झाली, तर भविष्यातील अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव होऊ शकतो. दरम्यान, भगवान जगन्नाथ हे केवळ ओडिशाचे नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रतिमेचा अवमान हा भावनिकदृष्ट्या कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा अवमान केल्यासारखा आहे.