बिबट्यापुढे ताकद दाखवण्याचा प्रयत्न महागात! 5 सेकंदात हातच तोडला – थरारक व्हिडीओ व्हायरल
बिबट्या हा जंगलातील सर्वात चपळ आणि धोकादायक शिकारी आहे. एका क्षणात हल्ला करून तो आपल्या शिकारिला नामोहरम करू शकतो. तरीही काही लोक आपल्या धाडसाच्या नावे त्याच्या समोर जाण्याचा मूर्खपणा करतात आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागते. असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून, एका अतिउत्साही तरुणाने बिबट्यापुढे ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताच बिबट्याने केवळ 5 सेकंदात त्याचा हात तोडला!
गावात शिरलेल्या बिबट्याचा थरार सोशल मीडियावर thenagarinews या इन्स्टाग्राम पेजवर एक धक्कादायक 10 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक बिबट्या गावात शिरून धावपळ करताना दिसतो. गावकऱ्यांनी हातात काठ्या घेऊन त्याचा पाठलाग केला. बिबट्याने एका उंच भिंतीवर उडी मारली, पण तिथेच एका तरुणाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याचा वाऱ्याच्या वेगाने हल्ला! हा तरुण स्वतःला बिबट्यापेक्षा बलवान समजत होता, पण बिबट्याने केवळ काही सेकंदात त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्याच्या हाताचा चावा घेत एका फटक्यात लचकाच तोडला. पुढे त्याचं काय झालं हे व्हिडीओत स्पष्ट दिसत नाही, पण एवढं नक्की की, त्या तरुणाची अवस्था अत्यंत गंभीर झाली असणार.
नेटकऱ्यांची जोरदार टीका – “अती शहाणपणा केला की असंच होतं!” या व्हिडीओला आतापर्यंत 43 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले असून, नेटकऱ्यांनी त्या तरुणावर जोरदार टीका केली आहे. “बिबट्याच्या ताकदीसमोर माणूस काहीच नाही, अती शहाणपणा केला की असंच काहीतरी घडतं!” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
हा प्रकार हा निसर्ग आणि वन्यजीव किती शक्तिशाली आहेत याचा स्पष्ट धडा आहे. प्राण्यांना उगाच उचकवण्याचा मूर्खपणा केल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा घटनांमधून योग्य धडा घेणे गरजेचे आहे!