समाज माध्यमावर एका एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारख

फॅक्टरीमध्ये ज्यूस बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई: आज कालच्या व्यस्थ जीवनशैलीमुळे बरीच लोकं त्यांच्या  खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाहीत. पूर्वी लोक घरगुती जेवणाला अधिक प्राधान्य देत होते, मात्र आता लोक बदलत्या जनरेशनमुळे बाहेरचं फास्ट फूड जास्त खाऊ लागले आहेत त्याचबरोबर पॅकेटमधील अनेक पदार्थ लोक रोज खातात. पॅकेटमध्ये बंद पदार्थ आरोग्यासाठी योग्य नसल्याचं अनेकदा सांगितलं जात पण तरीही जिभेचे चोचले काही कमी होत नाहीत.  

त्याचबरोबर आताची फास्ट फॉरवर्ड पिढी जास्त वेळ न जावा म्हणून काही गोष्टींमध्ये श्रम न घेता लवकर कश्या होतील याचा कल जास्त असतो. ज्यूस तयार करण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून लोक हे पॅकेटमधील ज्युसचं पितात. या ज्यूसमध्ये असे अनेक प्रिजर्वेटिव्स असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. अशात एका मोठ्या ज्यूस फॅक्टरीचा व्हिडीओल व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.

समाज माध्यमावर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारखान्यात ज्यूस बनवतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इथे बेरीजचा ज्यूस बनवला जात आहे. आणि या बेरीजचे ज्यूस बनवण्यासाठी जे यंत्र होतं त्यात बेरीजचा क्रश होत होता आणि हा क्रश होत असताना  अचानक लोकांची नजर सापावर पडते. फॅक्टरीचा कर्मचारी मोठ्या मुश्किलनं या सापाला मशीनच्या क्रशरमध्ये जाण्यापासून रोखतो. मात्र आता ही घटना जर कंपनीच्या कर्मचाऱ्याने पाहिली नसती तर बेरिजसोबत त्या सापाचाही चक्काचूर झाला असता आणि त्या ज्यूसमध्ये मिश्रित झाला असता एवढं नक्की.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी भयंकर  हैराण झाले असून संताप व्यक्त करत आहेत. असेही काही यूजर्स समोर आलेत, ज्यांनी स्वत: अशा ज्यूस फॅक्टरीमध्ये काम केलं आहे. एका व्यक्तीनं लिहिलं की, 'अनेकदा फळांसोबत उंदीर किंवा छोटे-मोठे जीव या मशीनमध्ये चिरडले जातात. त्यांना वेगळं काढलं जात नाही. फक्त पुढील प्रक्रियेत त्यांची टेस्ट दाबली जाते. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'कदाचित ज्यूस कंपन्यांच्या डब्यांवर इतर फ्लेवरचा अर्थ हाच होत असेल'. 

 

 

'>http://
 

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.