Viral Post: वडिलांचं मुलासोबत लेखी अॅग्रीमेंट, ' फक्त 'एवढं' करून दाखव... माझा 40 टक्के पगार तुझा!'
My Father Made A Declaration Viral Post: भारतीय पालक त्यांच्या मुलांना अभ्यास आणि परीक्षेत उत्कृष्ट कामगिरीसाठी काय करत नाहीत! आता अशाच स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या एका मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाला असं अॅग्रीमेंट करायला लावलं की, हे प्रकरण इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे.
विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. पंतप्रधान परीक्षांबद्दल चर्चा करून विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहेत. पण पालकांची प्रेरणा देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. जसे पूर्वीचे आई-बाबा म्हणायचे की, जर त्यांचा मुलगा/मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली तर ते त्यांना सायकल घेतील.
हेही वाचा - Black Sea Monster: प्रथमच कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लॅक सी मॉन्स्टर', दुर्मीळ व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ!
पण, सायकल आता चालत नाही इतकी मुले प्रगत झाली आहेत! यासंबंधीची एक मजेदार पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, एका रेडिट युजरने म्हटलंय की, त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास दरमहा स्वतःच्या पगारातील 40 टक्के रक्कम देण्याची ऑफर दिली आहे. ते नुसते ऑफर देऊन थांबलेले नाहीत तर, त्यांनी तसा लेखी करार करायला लावला!
<blockquote class="reddit-embed-bq" data-embed-height="620">Posts from the <a href="https://www.reddit.com/r/JEENEETards/comments/1it4wvr/my_father_made_a_declaration/">jeeneetards</a><br> community on Reddit</blockquote><script async="" src="https://embed.reddit.com/widgets.js" charset="UTF-8"></script>
काय आहे स्टोरी? ही पोस्ट १९ फेब्रुवारी रोजी रेडिट हँडल r/JEENEETards वरून शेअर करण्यात आली होती. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, माझ्या वडिलांनी एक घोषणा केली आहे. त्यांनी एका पत्रात लिहिले आहे की, जर त्यांच्या मुलाला आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी किंवा बिटसॅट सारख्या टॉपच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर, ते निवृत्त होईपर्यंत दरमहा त्यांच्या पगारातील 40 टक्के रक्कम मुलाला देतील. पण जर तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीच्या महाविद्यालयात गेला तर मुलाला आयुष्यभर त्याच्या पगाराचा 100 टक्के भाग त्याच्या वडिलांना द्यावा लागेल! ही एक उत्तम निवृत्ती योजना (रिटायरमेंट प्लॅन) आहे...
त्यानंतर पोस्टवर नेटिझन्सकडून मजेदार अटींसह प्रतिक्रियांचा पूर आला. एका युजरने विनोदाने लिहिलंय की, माझे वडील म्हणाले होते की, जर मी आयआयटीमध्ये गेलो तर ते नोकरीतून निवृत्त होतील! दुसऱ्याने म्हटलंय ही वडिलांसाठी एक उत्तम निवृत्ती योजना आहे! आणखी एका युजरने म्हटलं, समजा, तुम्ही तुमचा संपूर्ण पगार तुमच्या वडिलांना दिलात आणि तो पैसा त्यांनी कुठेतरी गुंतवला तर, नंतर 10 वर्षांनी ते पैसे तुम्हाला परत देऊन ते म्हणतील, बेटा, हा घे तुझ्यासाठी प्रेमाचा परतावा (return with love)!
काही लोकांनी ही पोस्ट अधिकच गांभीर्याने घेतली. त्यानंतर त्या मुलाने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला- खरंतर, आमच्या कुटुंबात हलक्याफुलक्या पद्धतीने केलेली ही एक मजेदार घोषणा आहे. मी दहावीत 90% गुण मिळवण्याबद्दल यापूर्वीही असेच एक निवेदन लिहिले गेले आहे. बाबांना सगळं लिखित स्वरूपात हवं असतं. ही त्यांची शैली आहे! तर भाऊ, मजा, प्रेरणा आणि मजेदार परिस्थिती देखील.. असे पालकत्व प्रत्येक घरात असले पाहिजे! नाही का?