Viral Video : मुलाकडून जन्मदात्याला मारहाण, आई मात्र बघत बसली; नागपूरच्या व्हायरल व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ
Son Beats Father Video Viral: आई-बाबा देवासमान मानले जातात. आपण त्यांना देवाचे दर्जा देतो. जन्म दिल्यापासून ते आपण मोठे होईपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीची अडचण होऊ नये. म्हणून ते प्रयत्न करत असतात. स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात. मात्र एवढ्या लाडाने वाढवलेला मुलगा बापाचा थोबाडीत मारत असेल तर हे संतापजनक आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्यांच्या वडिलांच्या थोबाडीत मारत आहे. दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सतत मुलगा त्याच्या वडिलांना मारत आहे. कधी कानावर मारत आहे. तर कधी मानेवर मारत आहे आणि गालावरही थोबाडीत मारत आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोटच्या मुलाने अशा प्रकारे वडिलांना मारहाण करणे अत्यंत चुकीचे आहे. संध्याकाळी वडील सोफ्यावर बसले असता मुलाने त्यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. धडाधड काहीही विचार न करता मुलगा वडिलांच्या थोबाडीत मारत राहिला आणि याचा व्हिडीओ चित्रित झाला. या व्हिडिओमध्ये वडिलांच्या बाजूला आई मेहंदी काढताना दिसत आहे. बिचारे वडील मुलाला हात जोडून माफी मागताना दिसत आहेत. तरीही त्या मुलाला बापाची दया येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
हा व्हिडीओ नागपूरचा असून नागपूर पोलिसांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर ते प्रचंड संतापले आणि त्यांनी संबंंधित मुलाचा शोध घेतला. ही घटना आम्हाला शुक्रवारी समजली. त्यानंतर नाईट ड्युटी ऑफिसर आणि तपास पथकाचे अधिकारी या व्हिडीओ कुठे घडला याचा शोध घेतला असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामठे यांनी सांगितले. यानंतर पोलीस शांतीनगर भागात पोहोचले.
नागपुरात एक व्हिडीओ व्हायरल असून व्हिडिओमध्ये मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांना मारहाण करत आहे. मुलगा कधी पित्याचे केस धरून तर कधी कान धरून, तर कधी मान पकडून मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओ नागपूर पोलिसांनी पाहिल्यानंतर त्याचा शोध घेतला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी शांतीनगर भागातील मुदलीयार चौकातील ते घर शोधून काढलं. मात्र, मारहाण होत असलेल्या पित्याने आपल्याला कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले. मुलाच्या आईने हे आमचे घरगुती कौटुंबिक प्रकरण असल्याचे सांगितले. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत मुलाला बऱ्यापैकी खडसावले आणि इशारा दिला आहे. तसेच वडिलांना तक्रार करायची असेल तर तक्रार दाखल करा असेही पोलिसांनी सांगितले आहे.