गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, नाखोन रत्चासिमा येथील

थायलंडमध्ये सापडली जगातील सर्वात उंच म्हैस; 6 फूट उंच म्हशीने नोंदवलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

World's Tallest Buffalo

World's Tallest Buffalo: थायलंडमधील एका शेतातील म्हशीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. खुरापासून खांद्यापर्यंत 6 फूट 8 इंच लांबीची ही म्हशी जगातील सर्वात उंच म्हशी म्हणून घोषित करण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, नाखोन रत्चासिमा येथील निनलानी फार्ममध्ये राहणारा किंग काँग सामान्य प्रौढ म्हशींपेक्षा सुमारे 20 इंच उंच आहे. ही म्हैस फारशी आक्रमक नाही. ती अतिशय सौम्य असून तिला तलावात फिरायला, केळी खायला आणि त्याची काळजी घेणाऱ्या माणसांसोबत खेळायला आवडते.

हेही वाचा - World's Most Expensive Cow: 40 कोटी रुपयांना विकली गेली 'ही' गाय! ठरली जगातील सर्वात महागडी गाय; काय आहे खास? वाचा

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, म्हशीची विक्रमी उंची 1 एप्रिल 2021 रोजी जन्मल्यापासूनच शेतमालक सुचार्ट बूनचारोएन यांना स्पष्ट झाली होती. म्हणूनच चित्रपटातील महाकाय राक्षसी गोरिल्लाच्या नावावरून त्याचे नाव किंग काँग ठेवण्यात आले. 

हेही वाचा - Sri Lanka Nationwide Power Cut : एका माकडामुळे संपूर्ण श्रीलंकेत ‘अंधार’, काय घडलं वाचा

चेरपॅट वुटी यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला सांगितले की, 'आम्हाला हे जाणवू लागले की किंग काँग जन्माला आल्यापासूनच इतर म्हशींपेक्षा खूपच उंच होती. सुरुवातीपासूनच हे स्पष्ट होते की, तिची उंची असाधारण होती. ती फक्त तीन वर्षांचा आहे, पण एवढ्या लहान वयातही ती खूप मोठी आहे.

असं सांगण्यात येत आहे की, किंग काँग खूप आज्ञाधारक आहे. तिला खेळायला आवडते. किंग काँगचा जन्म निनलानी फार्म येथे झाला. या म्हशीचे पालक अजूनही तेथेच राहतात.