नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या 10 कैद्यांनी भा

Nepali Prisoners: नेपाळी कैद्यांचा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न फसला; सीमा सुरक्षा दलाने केली अटक

Nepali Prisoners: नेपाळमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. निदर्शकांचा राग शांत होण्याचे नाव घेत नाही, तर 18 जिल्ह्यांमधील तुरुंगातून सुमारे 6 हजार कैदी पळून गेले आहेत. या दरम्यान, नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या 10 कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अटक करण्यात आली. एसएसबीने या 10 कैद्यांना पकडले. कैद्यांचे म्हणणे आहे की नेपाळमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तिथे लोक मारले जात आहेत. ते भारतीय तुरुंगात राहतील, पण नेपाळला परत जाणार नाहीत, असंही यावेळी कैद्यांनी नमूद केलं आहे. 

हेही वाचा -  Nepal Viral Video: चेहरा अन् छातीवर जखमा असूनही थेट आंदोलनात, नेपाळच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

प्राप्त माहितीनुसार, सशस्त्र सीमा दलाने (SSB) सिद्धार्थनगर परिसरातील भारत-नेपाळ सीमेवर हे 10 कैदी अटक केले. नंतर पुढील तपासासाठी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध नेपाळमध्ये निदर्शने सुरू झाली. या निदर्शनांमध्ये जनरेशन-झेड पिढीतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाल्याने आतापर्यंत 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Nepal Gen- Z Protest: रॅपर, महापौर ते Gen-Z आंदोलकांचे चाहते, कोण आहेत बालेन शाह?

पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतरही निदर्शकांचा राग शांत झालेला नाही. त्यांनी आज देखील अनेक सरकारी इमारतींना आग लावली. सध्या नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला असून परिस्थिती लष्कराच्या ताब्यात आहे. देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सैन्य दल निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.