भूकंपाचे धक्के तीव्र होते, परंतु अद्याप कोणत्याही

Earthquake in Greece: ग्रीक मध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

Earthquake in Greece प्रतिकात्मक प्रतिमा

Earthquake in Greece: मंगळवारी सकाळी ग्रीक बेट क्रेटला जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.3 होती. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने ही माहिती दिली आहे. हा भूकंप पूर्व भूमध्य समुद्रात झाला. त्याची खोली 14 किमी होती. भूकंप 83 किलोमीटर खोलीवर झाला.

प्राप्त माहितीनुसार, भूकंपाचे धक्के तीव्र होते, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी भूकंपस्थळी पोहोचून लोकांना मदत केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

ग्रीसमध्ये त्सुनामीचा इशारा जारी - 

ग्रीसमध्ये, कासोस बेटाच्या 48 किलोमीटर आग्नेयेस 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सुरक्षा मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना किनाऱ्यापासून दूर जाण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - Earthquake In Pakistan: पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला! ''किती'' होती भूकंपाची तीव्रता? जाणून घ्या

मेक्सिकोला भूकंपाचा धक्का - 

ग्रीसच्या आधी मेक्सिकोमध्ये एक जोरदार भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 मोजण्यात आली. भूकंपाची तीव्रता जास्त होती परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा - Earthquake In Pakistan: दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानला भूकंपाचे धक्के

इजिप्तमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के - 

याशिवाय इजिप्तमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. देशाच्या राष्ट्रीय खगोलशास्त्र आणि भूभौतिकशास्त्र संशोधन संस्थेने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त दिलेले नाही. इजिप्तच्या उत्तर किनाऱ्यापासून 431 किलोमीटर अंतरावर 6.4 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे संस्थेने म्हटले आहे.