हे प्रत्यारोपण ब्रेन डेड झालेल्या 39 वर्षीय व्यक्त

Pig Lung Transplant in Human: वैद्यकीय क्षेत्रातील मोठे यश! चीनमध्ये डुकराच्या फुफ्फुसाचे मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण

Pig Lung Transplant in Human: चीनमध्ये वैद्यकीय शास्त्राने एक क्रांतिकारक यश मिळवले आहे. तिथल्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच अनुवांशिकरित्या सुधारित डुकराचे फुफ्फुस मानवी शरीरात प्रत्यारोपित केले. हे प्रत्यारोपण ब्रेन डेड झालेल्या 39 वर्षीय व्यक्तीवर करण्यात आले, ज्याच्या कुटुंबाने प्रयोगासाठी परवानगी दिली होती. आश्चर्यकारक बाब म्हणजे हे फुफ्फुस तब्बल 9 दिवस मानवी शरीरात कार्यरत राहिले.

यापूर्वी डुकरांचे हृदय आणि मूत्रपिंड मानवांमध्ये प्रत्यारोपित करण्याचे प्रयत्न झाले आहेत. यात काही प्रमाणात यशही मिळाले. मात्र, डुकराच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ होती. डॉक्टरांच्या मते, फुफ्फुसे हे खूप गुंतागुंतीचे अवयव असल्याने त्यांचे प्रत्यारोपण अधिक कठीण असते.

हेही वाचा - Shocking Incident : 70 वा वाढदिवस अखेरचा ठरला! बर्थ डे पार्टीत चिकन खाल्लं अन्..

डुकराच्या फुफ्फुसातील बदल

प्रत्यारोपणापूर्वी डॉक्टरांनी डुकराच्या फुफ्फुसात 6 जीन एडिट केले होते. त्या डुकराचे संगोपन अतिशय सुरक्षित वातावरणात करण्यात आले. यासोबतच, रुग्णाला अनेक औषधे देखील देण्यात आली जेणेकरून संसर्ग किंवा नकाराचा धोका कमी होईल. प्रत्यारोपणानंतर सुरुवातीला फुफ्फुस व्यवस्थित काम करत होते, परंतु एका दिवसानंतर रुग्णाच्या शरीरात सूज आणि पाणी साचू लागले. हळूहळू शरीराने हा अवयव नाकारण्यास सुरुवात केली.

हेही वाचा - Viral Video: जिवंत झिंगा खाणं पडलं महागात, उलट महिलेवर हल्ला; काय घडलं बघा...

तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसे केवळ श्वासोच्छ्वासापुरती मर्यादित नसतात तर रक्त फिल्टर करणे, तापमान नियंत्रित ठेवणे, प्लेटलेट्स तयार करणे, रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवणे यासारख्या अनेक जबाबदाऱ्या निभावतात. तसेच, फुफ्फुसे थेट हवेतून विषाणू व बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्यांचे प्रत्यारोपण करणे अतिशय कठीण आहे.

अवयव प्रत्यारोपणाची गरज

अमेरिकेतील आकडेवारीनुसार, 2023 मध्ये सुमारे 1.3 लाख लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते, परंतु फक्त 48 हजारांना अवयव मिळाले. दररोज 13 लोक अवयव उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू पावतात. त्यामुळे डुकरांसारख्या प्राण्यांच्या अवयवांवर संशोधन करणे आवश्यक झाले आहे. सध्या मानवी शरीरात डुकराचे फुफ्फुस प्रत्यारोपण करणे पूर्णपणे यशस्वी ठरत नाही. मात्र, तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात स्टेम सेल्स, जीन एडिटिंग आणि मानवी पेशींचा वापर करून अधिक चांगले परिणाम मिळू शकतात.