अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत

Amul Brand: अमूल ब्रँड अमेरिकेत गाजतोय, ट्रम्पनं टेरिफ लावूनही भारतीय उत्पादन वरचढ

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टेरिफ लावला आहे. त्यामुळे भारतातून निर्यात होणारी उत्पादने अमेरिकेत महाग झाली आहेत. अशातच भारताची अमूल ही दुग्धजन्य पदार्थ बनवणारी कंपनी दिमाखात अमेरिकेत उत्पानने करुन अमेरिकेतच विकत आहे. म्हणूनच तिथे मेड इन इंडिया वस्तू दिमाखात विकल्या जात आहेत. दुसरीकडे अन्य वस्तू महाग मिळत असल्याने अमूलने एक जाहिरात केली आहे. 'मेड इन इंडिया एक लक्झरी ब्रँड (Luxury Brand) म्हणून अमेरिकेत ओळखला जातोय' अशा आशयाच्या होर्डिंगची जाहिरात अमूलने केली आहे. सध्या अमूलच्या जाहिरातीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते भारतावर अधिकाधिक टेरिफ लावत आहेत. यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात केला जाणारा माल खूप महाग विकला जात आहे. यावर अमूल कंपनीने जाहिरात करत मिश्किल टिप्पणी केली आहे. आता 'मेड इन इंडिया एक लक्झरी ब्रँड (Luxury Brand) म्हणून अमेरिकेत ओळखला जातोय' अशी टिप्पणी अमूलने होर्डिंग जाहिरातीतून केली आहे.

हेही वाचा: Balochistan Terrorist Attack: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 सैनिकांचा मृत्यू

अमेरिका बाजारपेठेत अमूलचा प्रवेश अमूलने मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) या 108 वर्ष जुन्या अमेरिकन डेअरीसोबत अमेरिकेत ताजे दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार, अमूलने अमेरिकेतील पूर्व आणि मध्य-पश्चिम बाजारपेठेत ताजी दूध उत्पादने सुरु केली आहेत. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, शिकागो, वॉशिंग्टन, डॅलस आणि टेक्सास यासारख्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय आणि आशियाई वंशाचे लोक राहतात. त्यामुळे अमूलने या शहरांना विशेष लक्ष केले आहे. अमूलने अमेरिकेत गोल्ड, शक्ती, ताजा आणि स्लिम एन ट्रिम असे चार प्रकारचे दूध लाँच केले आहे. 

अमेरिकेने लावलेला आयात शुल्क टाळण्यासाठी अमूलने एक युक्ती शोधून काढली आहे. त्यांनी अमेरिकेतील मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) याा जुन्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या करारानुसार, अमूलची उत्पादने त्यांच्याच खास रेसिपी आणि पॅकेजिंगसह अमेरिकेत तयार केली जातात. त्यामुळे अमूलने एका बाजूला अमूल कंपनीला आयात खर्चाचा भार टाळता येतो आणि दुसऱ्या बाजूला ताजी उत्पादने ग्राहकांपर्यंत जलद पोहोचवता येतात. ही रणनीती अमूलला अमेरिकेच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे.