भारतातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या

पाकिस्तानला आणखी एक झटका! CAIT कडून पाकिस्तानसोबतचे सर्व व्यावसायिक करार संपवण्याची घोषणा

India pakistan trade

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला दररोज नव-नवीन धक्के बसत आहेत.  भारतातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 1 मे पासून पाकिस्तानसोबत कोणताही व्यापार करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत केलेले सर्व करार रद्द केले जातील. भुवनेश्वर येथे झालेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अखिल भारतीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

पाकिस्तानसोबतचे सर्व व्यावसायिक करार संपुष्टात - 

कॉन्फिडन्स ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे देशभरात सुमारे 9 कोटी व्यापारी सदस्य आहेत. समितीचे अध्यक्ष बी.सी. भारतीय यांनी सांगितले की, भुवनेश्वरच्या बैठकीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यामध्ये पाकिस्तानसोबतचे सर्व व्यावसायिक करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानातील व्यापारी कॅटद्वारे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करतात.

हेही वाचा - पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील 'हे' 48 पर्यटन स्थळे बंद

भारत-पाकिस्तान व्यापार - 

दरम्यान, कॉन्फिडन्स ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अध्यक्षांनी सांगितले की, भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबत साखर, सिमेंट, लोखंड, वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रिकल वस्तूंचा व्यवसाय करतात, परंतु आता त्यांनी 1 मे पासून हा व्यवसाय न करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापाऱ्यांनी असेही म्हटले आहे की ते लवकरच पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय, वाणिज्य मंत्रालयाला याबद्दल माहिती देतील. या निर्णयामुळे पाकिस्तान आर्थिकदृष्ट्याही कमकुवत होईल.

हेही वाचा - सैरावैरा पळणारे पर्यटक अन् गोळीबाराचा भीषण आवाज; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक VIDEO

तथापि, संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय व्यापारी तिथून सुक्या मेव्याची मागणी करतात, परंतु त्या भागात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते सर्व करार रद्द करतील. 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. परिणामी, दोन्ही देशांमधील व्यापारात मोठी घट झाली होती. आता पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापार बंद करण्यात आला आहे.