नवीन आयफोन 17 मालिकेत अनेक प्रकारचे अपग्रेड दिसतील

आज iPhone 17 होणार लॉंच, जाणून घ्या किती असणार किंमत ?

अॅपलचा 'awe ड्रॉपिंग' आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमात, अॅपल नवीन आयफोन 17 मालिकेव्यतिरिक्त अॅपल वॉच आणि वॉच अल्ट्राची नवीन पिढी सादर करेल. आयफोन प्रेमी बऱ्याच काळापासून नवीन आयफोन मालिकेची वाट पाहत होते. गेल्या वर्षीही कंपनीने 9 सप्टेंबर रोजी भारतासह जगभरात त्यांची आयफोन 16 मालिका लाँच केली होती. नवीन आयफोन 17 मालिकेत अनेक प्रकारचे अपग्रेड दिसतील. विशेषतः 5 वर्षांनंतर, कंपनी त्यांच्या प्रो मॉडेलच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते.

अॅपलचा हा 'अवे ड्रॉपिंग इव्हेंट' आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता सुरू होईल. आयफोन 17 मालिकेचा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अॅपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. या कार्यक्रमात नवीन आयफोन 17 मालिकेसोबत, नवीन पिढीचे अ‍ॅपल वॉच आणि वॉच अल्ट्रा देखील सादर केले जाऊ शकतात. तसेच, iOS 26 देखील रोल आउट केले जाईल.

हेही वाचा - PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ 

अॅपलच्या या नवीन मालिकेत, कंपनी गेल्या वर्षीप्रमाणे चार नवीन मॉडेल्स सादर करणार आहे. तथापि, यावेळी कंपनी त्यांचे प्लस मॉडेल लाँच करणार नाही. तथापि, यावेळी कंपनी त्यांचे प्लस मॉडेल लाँच करणार नाही. त्याऐवजी, Apple iPhone 17 Air सादर करेल, जो कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात  स्लीम आयफोन असेल. आयफोन १७ आणि आयफोन १७ एअर व्यतिरिक्त, कंपनी आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स देखील सादर करणार आहे. आयफोन 17 ची डिझाइन गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 16 सारखीच असेल.

हेही वाचा - Vice President Election 2025 : आज मतदान...कोण होणार भारताचे पुढील उपराष्ट्रपती ? 

किंमत किती असेल ? 

कंपनी गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 50 डॉलर  म्हणजे अंदाजे 4000 रुपये महागड्या किमतीत आपली नवीन आयफोन मालिका लाँच करू शकते. आयफोन 17,84,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो.त्याच वेळी, आयफोन 17 एअर 1,09,900   रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत, आयफोन 17 प्रो 1,24,900 रुपयांना आणि आयफोन 17 प्रो मॅक्स 1,64,900 रुपयांना मिळू शकतो.

काय असणार नवीन ? 

आयफोन 17 मालिकेत डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरामध्ये अपग्रेड केले जातील. या वर्षी लाँच झालेल्या सर्व आयफोन मॉडेल्समध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ओएलईडी डिस्प्ले असू शकतात.