वयाच्या 27 व्या वर्षी कमावली एलोन मस्क इतकी संपत्ती; कोण आहे 'ही' अद्भुत व्यक्ती? जाणून घ्या
Worlds Youngest Self Made Billionaire: सध्या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलान मस्क यांचे नाव सर्वत्र चर्चेत आले आहे. मात्र, आता जगात अशी एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं लोक दुसरा एलान मस्क असं वर्णन करत आहेत. या तरुणाचं नाव आहे अलेक्झांडर वांग. लोक अलेक्झांडर वांग यांना जगातील दुसरे एलोन मस्क म्हणत आहेत. इतक्या लहान वयात त्यांनी जे अद्भुत काम केले आहे ते कोणीही करू शकत नाही. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांच्याकडे 8700 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
27 व्या वर्षी 8700 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक-
अलेक्झांडर वांग यांनी वयाच्या 19 व्या वर्षी स्केल AI चा पाया घातला आणि वयाच्या 27 व्या वर्षी 8700 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक बनले. त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 63 हजार कोटी रुपये आहे. 2022 मध्ये फोर्ब्सने त्यांना जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश म्हणून निवडले होते. आज, 27 वर्षांच्या तरुणाची तुलना टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्कशी केली जात आहे. यावरून वांग यांची भविष्यातील झेप किती शक्तिशाली असेल, हे लक्षात येते.
हेही वाचा - Zuchongzhi 3.0: चीनचा नवीन Supercomputer गुगलच्या Sycamore पेक्षा 10 लाख पट वेगवान; काय आहे खास? वाचा 19 व्या वर्षी Scale AI सॉफ्टवेअर कंपनी केली सुरू -
अलेक्झांडर वांग सुरुवातीपासूनच गणित आणि कोडिंगमध्ये तज्ज्ञ होते. वांगने वयाच्या 17 व्या वर्षी अड्डेपर नावाच्या संपत्ती व्यवस्थापन कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी Quora मध्ये टेक लीड म्हणून काम केले. या काळात त्याची लुसी गुओशी मैत्री झाली, दोघांनीही मशीन लर्निंगचा अभ्यास करण्यासाठी नोकरी सोडली आणि अमेरिकेतील प्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये प्रवेश घेतला. तथापि, काही काळ शिक्षण घेतल्यानंतर वांगने एमआयटी सोडली आणि वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी लुसी गुओ सोबत Scale AI ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली.
हेही वाचा - मेटा AI साठी वेगळे अॅप लाँच करणार; ChatGpt आणि Gemini ला देणार टक्कर
वांग यांचा स्केल एआय कंपनीत 15 टक्के हिस्सा -
स्केल एआयचा उद्देश मोठ्या आणि गुंतागुंतीच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी एआय वापरणे हा होता. आज स्केल एआयचे मूल्यांकन 7.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 63,772 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, त्यांच्या कंपनीने प्रचंड यश मिळवले आहे. वांग यांचा कंपनीत 15 % हिस्सा आहे. स्केल एआय केवळ व्यवसाय क्षेत्रातच नाही तर संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेतही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.