विजय मल्ल्याला मोठा झटका! भारतीय बँकांनी दीर्घ लढाईनंतर जिंकली केस; आता ब्रिटनमधील मालमत्ता होणार जप्त
Vijay Mallya Bankruptcy: बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांना मोठा झटका बसला आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या एका संघाने मल्ल्याविरुद्ध यूकेमध्ये दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी न्यायालयीन अपील खटला जिंकला आहे. भारतीय बँकांना दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळाला आहे. किंगफिशर एअरलाइन्सवरील थकीत कर्जाची परतफेड करण्याची मागणी भारतीय बँका करत आहेत.
ब्रिटिश न्यायालयाने दिला भारतीय बँकांच्या बाजूने निकाल -
भारतीय बँकांनी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती, जेणेकरून ते त्याच्या ब्रिटनमधील मालमत्तेवरून कर्ज वसूल करू शकतील. आता ब्रिटिश न्यायालयाने भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला आहे. लंडन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अँथनी मान यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला आहे. तर विजय मल्ल्या यांनी दाखल केलेल्या अपीलची परवानगी मागणारे दोन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणात विजय मल्ल्या फरार -
दरम्यान, मल्ल्याला भारतात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली फरार घोषित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती मान यांनी म्हटलं की, बँकांचा युक्तिवाद असा होता की त्यांना तो स्वीकारावा लागला. भारतीय बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदा फर्म टीएलटी एलएलपीने म्हटले आहे की, या निकालामुळे बँकांना मल्ल्याच्या मालमत्तेवर कोणतेही संरक्षण नसल्याचे आणि दिवाळखोरीची याचिका वैध असल्याचे पुष्टी मिळाली आहे.
हेही वाचा - एअर इंडियाच्या विमानात घृणास्पद कृत्य! मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर केली लघवी
तथापि, टीएलटी एलएलपीचे कायदेशीर संचालक निक कर्लिंग यांनी म्हटलं आहे की, बँकांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. मल्ल्याविरुद्ध मिळालेल्या 1.12 अब्ज पौंडाच्या डीआरटी (कर्ज वसुली न्यायाधिकरण) निकालासंदर्भात 2017 पासून बँकांसाठी काम करत असल्याने, टीएलटीला हा निकाल मिळाल्याबद्दल आनंद आहे.