Iran Israel Ceasefire: 'दोन्ही देशांना युद्धबंदी हवी होती...'; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
Iran Israel Ceasefire: मंगळवारी इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवसांनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धबंदीची घोषणा केली. आता ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यात एक नवा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर म्हटले आहे की, इस्रायल आणि इराण दोघेही युद्ध थांबवू इच्छितात. इराणच्या सर्व अणु सुविधा आणि क्षमता नष्ट करणे आणि नंतर युद्ध थांबवणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे
हेही वाचा - 'तुमच्या वैमानिकांना परत बोलवा...'; युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही दोन्ही देश एकमेकांवर हल्ले थांबवत नव्हते. ट्रम्प यांनी याबद्दल इस्रायलवर नाराजी व्यक्त केली. ट्रम्पच्या घोषणेनंतर इस्रायलने आरोप केला की इराण इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागत आहे. यानंतर इस्रायलनेही आपली लढाऊ विमाने पाठवली. यानंतर ट्रम्पने इस्रायलला इराणवर बॉम्ब टाकू नये असा इशारा दिला. असे करणे युद्धबंदीचे उल्लंघन ठरेल. तुमच्या वैमानिकांना परत बोलावा. ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदी उल्लंघनाचा इशारा -
यापूर्वी, हेग येथे होणाऱ्या नाटो शिखर परिषदेला जाण्यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्पने मंगळवारी शत्रुत्व थांबवण्याच्या अंतिम मुदतीनंतरही सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल निराशा व्यक्त केली. ट्रम्प यांनी सांगितलं की, 'इस्रायलनेही युद्धहबंदीचे उल्लंघन केले. मी इस्रायलवर खूश नाही. आम्ही करार झाल्यानंतर लगेचच इस्रायलने हल्ले सुरू केले हे मला आवडले नाही.'