युटा काउंटीचे वकील जेफ ग्रे यांनी न्यायालयात सांगि

Charlie Kirk: 'चार्ली कर्कला मारले कारण...'; कर्कच्या मारेकऱ्याने जोडीदाराला सांगितला होता हत्येचा संपूर्ण कट

Charlie Kirk Murder: अमेरिकेतील रूढीवादी कार्यकर्ते आणि रिपब्लिकन युवा चळवळीचे प्रमुख नेते चार्ली कर्क यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी टायलर रॉबिन्सनवर मंगळवारी अधिकृतपणे आरोप ठेवण्यात आले. युटा काउंटीचे वकील जेफ ग्रे यांनी न्यायालयात सांगितले की, रॉबिन्सनने आपल्या सहकाऱ्याला पाठवलेल्या संदेशामध्ये हत्येची कबुली दिली होती. त्याने सोडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते की, 'देशातील सर्वात प्रभावशाली रूढीवादींपैकी एकाला संपवण्याची संधी मला मिळाली आहे आणि मी ती सोडणार नाही.'

चार्ली कर्कची युटामध्ये हत्या

10 सप्टेंबर रोजी कर्क यांची युटा व्हॅली विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवादादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने जवळील इमारतीच्या छतावरून बोल्ट-अ‍ॅक्शन रायफलने गोळी झाडली, जी कर्क यांच्या मानेवर लागली. कर्क यांनी रिपब्लिकन पक्षातील तरुणांना संघटित करण्यात आणि 2024 च्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी कामगिरी बजावली होती.

हेही वाचा - Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबावर भारताच्या हल्ल्याचा गंभीर परिणाम; जैशची कबुली, व्हिडिओ व्हायरल

आरोपीविरुद्ध ठोस पुरावे

सरकारी वकिलांच्या मते, रॉबिन्सनने आठवडाभर हल्ल्याची योजना आखली होती. तपासादरम्यान मिळालेल्या रायफलवरील ट्रिगरवरून मिळालेल्या डीएनएचे नमुने रॉबिन्सनशी जुळले आहेत. या पुराव्यांवरून तो दोषी ठरल्यास मृत्युदंड किंवा जन्मठेप होऊ शकते.

हेही वाचा - SBI Bank Robbery: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एसबीआय बँकेवर दरोडा; 50 किलो सोने आणि 8 कोटी रुपयांची रोकड लुटली

ट्रान्सजेंडर प्रश्नांशी निगडित वाद?

या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, रॉबिन्सनने आपल्या जोडीदाराला पाठवलेल्या संदेशामध्ये लिहिले होते, 'मी कर्कच्या द्वेषाला कंटाळलो आहे. काही द्वेष संवादाद्वारे संपवता येत नाहीत.' तपासात उघड झाले की, रॉबिन्सन एका ट्रान्सजेंडर मित्रासोबत राहत होता. पोलिस त्याच्या मित्राची चौकशी करत आहेत.

कुटुंबीयांची माहिती आणि आरोप

रॉबिन्सनच्या आईने अधिकाऱ्यांना सांगितले की, गेल्या वर्षभरात तो राजकीयदृष्ट्या डाव्या विचारसरणीकडे झुकला होता. तसेच, ट्रान्सजेंडर पुरुषाशी संबंध आल्यापासून तो समलैंगिक व ट्रान्सजेंडर हक्कांचा पुरस्कर्ता बनला होता. त्याच्यावर खून, हत्येचा प्रयत्न, पुराव्यांशी छेडछाड, न्यायात अडथळा आणि मुलाशी संबंधित हिंसाचार अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले आहेत. दोष सिद्ध झाल्यास टायलर रॉबिन्सनला मृत्युदंड, पॅरोलशिवाय जन्मठेप किंवा किमान 25 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.