चीनची अधिकृत वृत्तसंस्था 'शिन्हुआ' नुसार, या संभाष

डोनाल्ड ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा; कोणत्या मुद्द्यांवर झाली खलबत?

Donald Trump, Xi Jinping

Donald Trump Phone Conversation With Xi Jinping: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात 5 जून रोजी फोनवरून चर्चा झाली. दोन्ही देशांमधील टॅरिफ वाढवण्याची आणि व्यापार तणावाची स्पर्धा शिगेला पोहोचली असताना दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याने जगभरात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था 'शिन्हुआ' नुसार, या संभाषणाची पुष्टी झाली आहे परंतु संभाषणात कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, व्हाईट हाऊसनेही या संभाषणाची पुष्टी केली आहे परंतु त्याबद्दल सविस्तर माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्यानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात थोडीशी वाढ दिसून आली आहे. असे मानले जाते की या संभाषणामुळे दोन्ही देशांमधील वाढता व्यापार तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्याच वेळी, अमेरिकेतील चिनी दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. 

हेही वाचा - Ukraine Russia War: ट्रम्पसोबत चर्चा केल्यानंतर काही तासांतच रशियाचा युक्रेनवर हल्ला; 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, आम्ही अमेरिकेला निष्पक्ष स्पर्धेचे बाजार तत्व कायम ठेवण्याचे, व्यापार मुद्द्यांचे राजकारण करणे थांबवण्याचे आणि चिनी आणि इतर परदेशी व्यवसायांसाठी निष्पक्ष, न्याय्य आणि भेदभावरहित वातावरण प्रदान करण्याचे आवाहन करतो. 

हेही वाचा - अमेरिकेत 12 देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

तथापि, अलिकडेच ट्रम्प प्रशासनाने दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते असे संकेत दिले होते, परंतु वेळ आणि विषयाची माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. याशिवाय, अमेरिकेने मोठ्या संख्येने चिनी विद्यार्थ्यांना देशातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.