दारू प्या आणि सुट्टीवर जा.. जपानच्या कंपनीची अनोखी ऑफर
जपान : जपानमध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनोखा फतवा काढल्याचे समोर आले आहे. नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी आणि कार्यालयात आरामदायी वातावरण निर्मितीसाठी जपानमधील एका कंपनीने अनोखी ऑफर दिली आहे. ओसाकास्थित ट्रस्ट रिंग कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी मद्यपान करून हँगओव्हर रजा घेण्यास कंपनी सांगत आहे. जपानमधील ट्रस्ट रिंग कंपनीचा हा अनोखा फतवा ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खर आहे. ट्रस्ट रिंग कंपनी कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे पेये पुरवते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दोन- तीन तासांची हँगओव्हर रजा देखील दिली जाते. कंपनी सुरुवातीला 1 लाख 27 हजार रुपये वेतन देते. शिवाय कर्मचाऱ्यांना 20 तासांचा ओव्हरटाईमही देते.
हेही वाचा : रुपाली चाकणकरांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक
कंपनीचे सीईओ काय म्हणाले?
मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत ट्रस्ट रिंगचे मर्यादित बजेट पाहता, आम्ही कामाच्या ठिकाणी आल्हाददायी आणि आरामदायी वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही पगाराबाबत इतर कंपन्यांशी तुलना करू शकत नाही. मात्र कर्मचाऱ्यांना आरामदायी आणि मजेशीर वातावरण प्रदान करू शकतो. यामुळे कर्मचारी आमच्यासोबत जोडले जातील, असे ट्रस्ट रिंगचे सीईओ म्हणाले. कंपनीचे सीईओ देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मद्यपान करतात.