जनरेशन-Z आंदोलकांच्या नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनान

Sushila Karki: जनरेशन-Z च्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती

Nepal Protests: मंगळवारी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या जजनरेशन-Z आंदोलकांच्या नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनानंतर, नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरू झाली आहे. या घडामोडीत देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी पुढे आले आहे.

जनरल झेडची ऑनलाइन बैठक

नेपाळी लष्कराने देशाचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी निदर्शकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन व्हर्च्युअल बैठक घेतली. सुमारे 4 हजार हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला. या बैठकीत बहुमताने कार्की यांना समर्थन मिळाले. सुशीला कार्की यांना 31 टक्के मते तर काठमांडू महापौर बालेन शाह यांना 27 टक्के मते मिळाली. 

हेही वाचा - Gen-Z Meaning: जनरेशन Z म्हणजे कोण? कोणत्या वयोगटातील लोक या पिढीत येतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सुशीला कार्की कोण?

सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. भ्रष्टाचारविरोधी कडक निर्णय, जलदगती न्यायालये स्थापन करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. 2017 मध्ये त्यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव मांडला गेला होता, पण मोठ्या प्रमाणात जनतेच्या पाठिंब्यामुळे तो मागे घेण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याने तटस्थ पर्याय म्हणून त्यांना निवडण्यात आले आहे.

हेही वाचा - France Violence: नेपाळनंतर फ्रान्सच्या रस्त्यांवर उफाळला हिंसाचार! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात केली निदर्शने

सुशीला कार्की यांना 7 भावंडे आहेत. या सर्वांमध्ये त्या मोठ्या आहेत. 1972 मध्ये कार्की यांनी विराटनगर येथील महेंद्र मोरंग कॅम्पसमधून बीए पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्या भारतात आल्या. येथे कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1978 मध्ये त्यांनी नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. कार्की यांनी दुर्गा प्रसाद सुवेदीशी लग्न केले. कार्की यांचा बनारसमध्ये शिक्षण घेत असताना सुवेदीशी परिचय झाला. कार्की यांचे पती दुर्गा सुवेदी हे त्यावेळी नेपाळी काँग्रेसचे लोकप्रिय युवा नेते होते.