America Tariff On India Impact : अमरिकेने टॅरिफ लावला, पण फायदा भारतालाच झाला, कसा ? जाणून घ्या
अमेरिका-भारत यांच्यातील टॅरिफ वाद चांगलाच चर्चेत राहिला आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 % टरिफ लावण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर झालेला बघायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतावर लावलेल्या टरिफमुळे आता अमेरिकेत महागाई वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तेथील अनेक जीवनावश्यक वस्तु महाग झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेववरदेखील याचं परिणाम दिसून आला आहे. अशातच आता भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
टरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. मात्र त्यानंतर भारताचे रशिया आणि चीनसोबत मात्र जवळीक निर्माण झाली. आशातच रशियाने भारतासाठी संपूर्ण बाजारपेठ खुली केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय कंपन्यांनी आता रशियाबरोबर निर्यात वाढवली आहे. तसेच पश्चिमेकडील कंपन्यांनी रशियाशी व्यापार न करण्याचे ठरवले असून याचा फायदा भारताततील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होणार आहे. त्यामुळे रशियात भारतीय वस्तूंची निर्यात करण्यास मोठी संधी मिळाली आहे.
त्याचप्रमाणे समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारपेठ संपूर्ण रशियन बाजार पेठेचा संपूर्ण ताबा घेऊ शकतात. यामुळे अमेरिकेने लादलेल्या टरिफमुळे भारताचे झालेले नुकसान भरून निघू शकते. भारतीय कंपन्या मोठ्या संख्येनं रशियामध्ये येत असल्यानं आता पश्चिमेकडील देशाच्या कंपन्या देशातून काढता पाय घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोरोनापूर्वी भारताचा रशियासोबत व्यापार केवळ 10.1 अब्ज डॉलरचा होता, जो 2024-25 मध्ये 2024-25 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 2030 पर्यंत तो 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज आहे.