या हल्ल्यादरम्यान, महिला टीव्ही अँकर एका लाईव्ह शो

लाईव्ह टेलीकास्ट सुरू असताना इस्रायलचा इराणी ब्रॉडकास्ट इमारतीवर हल्ला; टीव्ही अँकरने काढला स्टुडिओमधून पळ

Iran state TV hit in Israeli attack on Tehran

Iran State TV Hit In Israeli Attack: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सोमवारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील देशाच्या अधिकृत वृत्तवाहिनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) च्या इमारतीवर बॉम्बस्फोट केला. या हल्ल्यादरम्यान, महिला टीव्ही अँकर एका लाईव्ह शोमध्ये इस्त्रायली हल्ल्याची तीव्रता दाखवत होती. याचवेळी इस्त्रायलने हल्ला केला. यावेळी टीव्ही अँकरने स्वत:चा जीव मुठीत धरून स्टूडिओमधून पळ काढला. हा सर्व प्रकार लाईव्ह टेलिकास्टमध्ये कैद झाला आहे.  

हल्ल्यात अनेक रेडिओ आणि टीव्ही कर्मचारी ठार - 

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला अँकर बातम्या वाचत असल्याचे दिसून येते. या दरम्यान अचानक स्फोट झाला. त्यानंतर अँकर खुर्चीवरून उठते आणि जीव वाचवण्यासाठी पळ काढू लागते. त्यानंतर स्टुडिओ ढिगाऱ्यांनी आणि धुराने भरतो. या व्हिडिओमध्ये अल्लाहू अकबर म्हणत असलेल्या व्यक्तीचा आवाज येत आहे. इराणी माध्यमांनुसार, या हल्ल्यात इराणी रेडिओ आणि टीव्हीशी संबंधित अनेक कर्मचारी मारले गेले.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान प्रदान 

लाईव्ह टेलीकास्ट सुरू असताना इस्रायलचा इराणी ब्रॉडकास्ट इमारतीवर हल्ला - 

इस्रायल आणि इराणमधील तणाव सतत वाढत असून दोन्ही देशामध्ये आता युद्धासारखी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ताज्या वृत्तानुसार, इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने आज सकाळी इराणवर आणखी एक हल्ला केला आहे. 

हेही वाचा - Earthquake In Peru: पेरूला 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, पहा व्हिडिओ

इस्रायलचा मिसाइल लाँचरने भरलेल्या ट्रकवर हल्ला - 

दरम्यान, आज इस्रायली सैन्याने तेहरानकडे जाणाऱ्या क्षेपणास्त्र लाँचरने भरलेल्या अनेक ट्रकला लक्ष्य केले. गेल्या काही दिवसांपासून इस्रायली सैन्य इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. गेल्या चार दिवसांत इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणमध्ये एकूण 224 लोक ठार झाले आहेत. इराण देखील इस्रायली हल्ल्यांना सतत प्रत्युत्तर देत आहे. प्राप्त माहितीनुसार, इराणी सैन्याने मध्य इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.