Jeff Bezos-Lauren Sánchez Wedding: जेफ बेझोस करणार लॉरेन सांचेझशी विवाह! भव्य लग्नसोहळ्यात काय असणार खास?
Jeff Bezos-Lauren Sánchez Wedding: अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेझोस हे त्यांची मंगेतर लॉरेन सांचेझ हिच्याशी इटलीतील व्हेनिस येथे एका आलिशान सोहळ्यात लग्न करणार आहेत. हे लग्न व्हेनिसमधील एका खाजगी बेटावर होणार आहे, ज्यामध्ये सुमारे 200 हाय-प्रोफाइल पाहुणे सहभागी होतील. हा लग्नसोहळा अत्यंत दिमाकदार असणार आहे. हा विवाह सोहळा तीन मोठ्या नौकांवर होणार आहे.
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचा विवाह -
61 वर्षीय जेफ बेझोस आणि त्यांची मंगेतर लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाच्या बातम्या जगभरात प्रसिद्ध होत आहेत. असे मानले जाते की हे लग्न 26 जून 2025 रोजी इटलीतील व्हेनिसमधील एका खाजगी बेटावर होईल. या भव्य समारंभात 200 हाय-प्रोफाइल पाहुणे, तीन मोठ्या नौका आणि असंख्य आलिशान व्यवस्था असतील.
20 कोटी रुपयांची एंगेजमेंट रिंग -
दरम्यान, जेफ बेझोसची सुपरयॉट कोरू 6 दिवसांच्या लग्नादरम्यान एका बेटावर राहणार आहे. ही नौका सुमारे 127 मीटर लांब आहे, ज्याची किंमत सुमारे 500 दशलक्ष डॉलर्स आहे. याशिवाय 20 कोटी रुपयांची एंगेजमेंट रिंग देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा - 'युद्धविराम आता सुरू झाला आहे, तो मोडू नका'; ट्रम्प यांचे इराण आणि इस्रायलला आवाहन
200 हाय प्रोफाइल पाहुणे - या विवाह सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुटुंबातील सदस्य, ओप्रा विन्फ्रे ऑरलँडो ब्लूम, केटी पेरी, किम कार्दशियन, क्रिस जेनर, जेरेड कुशनर असे अनेक मोठे व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तथापि, पाहुण्यांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. पाहुण्यांची द अमन व्हेनिस आणि हॉटेल सिप्रियानी सारख्या 5 आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तथापी, बेझोसने पाहुण्यांसाठी व्हेनिसच्या खाजगी वॉटर टॅक्सींचा ताफा बुक केला आहे.
हेही वाचा - पाकिस्तानने नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव
कोण आहे लॉरेन सांचेझ?
लॉरेन सांचेझ ही एक प्रसिद्ध अमेरिकन मीडिया व्यक्तिमत्व, न्यूज अँकर आणि निर्माती आहे. ती ब्लॅक ऑप्स एव्हिएशन या हवाई चित्रीकरण कंपनीची संस्थापक देखील आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, जेफ बेझोस हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 230 अब्ज डॉलर्स आहे.