बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल

Balochistan Terrorist Attack: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 सैनिकांचा मृत्यू

Balochistan Terrorist Attack: पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 9 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. वाशुक जिल्ह्यात डझनभर दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशन आणि सीमा दलाच्या संकुलावर हल्ला चढवला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, नाव न सांगण्याच्या अटीवर, सांगितले की सैन्याची हालचाल सुरू असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत हल्ला केला.

जाफर एक्सप्रेसलाही बनवले लक्ष्य - 

यापूर्वी बलुचिस्तानमधील मास्तुंग जिल्ह्यात जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला करण्यात आला होता. ट्रॅकवर लावलेल्या स्फोटकांमुळे ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. या घटनेत चार जण जखमी झाले होते. हल्ल्याच्या वेळी ट्रेन पेशावरकडे जात होती.

हेही वाचा -India vs Pakistan: भारताने पाकिस्तानी दूतावासाला वर्तमानपत्रांचा पुरवठा थांबवला; शत्रू देशाला दिलं सडेतोड उत्तर 

अलिकडेच, बलुचिस्तानमध्ये कराचीहून क्वेट्टाकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला करून 3 जणांना ठार केले होते. यात सात जण जखमी झाले होते. तसेच, किल्ला अब्दुल्ला जिल्ह्यातील जब्बार मार्केटजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 4 जण ठार तर 20 जण जखमी झाले. या स्फोटात अनेक इमारतींचे नुकसान झाले आणि काही ठिकाणी आग लागली.

हेही वाचा - Nitesh Rane on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाचा भारतातील कोळंबीवरही परिणाम ; नितेश राणे म्हणाले, "कोळंबी खा..."

बलुचिस्तानचा अस्थिर इतिहास - 

बलुचिस्तान प्रांत गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेचा सामना करत आहे. स्थानिक बलुच गट आणि त्यांचे समर्थक पाकिस्तान सरकारवर खनिज संपत्तीचे शोषण केल्याचा आरोप करतात. अलीकडील काळात बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानी सुरक्षा दलांवर वारंवार प्राणघातक हल्ले होत आहेत.