पुरुषांसाठीची गर्भनिरोधक गोळी लवकरच ?
प्रसाद काथे, मुंबई: अमेरिकेत पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवरचे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे. पुरुषांसाठी ही एक नवी क्रांती मानली जात आहे. अमेरिकेत पुरुषांच्या हार्मोन नियंत्रणावरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. गेटेर्ड रोहे आणि डॉ. स्टेफनी पेज यांच्याकडून हे संशोधन करण्यात येत आहे. उंदरावरील संशोधन यशस्वी झाले असून पुरुषांवरील संशोधन अंतिम टप्प्यात आहे. सोळा पुरुषांवर गर्भनिरोधक गोळीच्या चाचण्या 99 टक्के यशस्वी झाल्या आहेत. चाचण्या पूर्ण यशस्वी झाल्यास 2030 मध्ये उत्पादन बाजारात येणार आहे.
पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीचे फायदे कोणते? संभोग सुखात कसलीच अडचण नाही. संभोगादरम्यानचा महिलांवरील दबाव संपेल. महिलांच्या आरोग्याचा धोका टळेल. गर्भधारणेचा स्त्रीचा अधिकार सुरक्षित राहील. वीर्य निस्तेज होईल. मात्र, कामजीवन आनंदी असेल. पुरुषांचा स्टॅमिना कमी होणार नाही.
हेही वाचा: मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे महायुती अडचणीत
पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळीची गरज का आलीय? संभोग करताना बहुतेक पुरुष कंडोमचा वापर टाळतात. विनाकंडोम संभोग स्त्रीसाठी तणावपूर्ण असतो. इच्छा नसताना गरोदर राहण्याचा स्त्रीवर दबाव येतो. विनाकारणाचे मातृत्व स्त्रीसाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तणावाचे कारण बनते. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने मासिक पाळी अनियमित होते.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या बाजारात सध्याची उत्पादने केवळ महिलांसाठी असताना त्यात आता क्रांतिकारक बदल घडू शकतो. अमेरिकेत पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवरचे संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.