या विक्रीने अमृता शेरगिलचा जुना विक्रम मोडला आहे.

MF Husain’s 'Untitled' Painting: एम.एफ. हुसेन यांच्या 'अनटाइटल्ड' पेंटिंगने रचला इतिहास; 'इतक्या' कोटीला विकली गेली एक पेटिंग

MF Hussain Untitled Painting

MF Husain Untitled Painting: न्यू यॉर्क क्रिस्टीज येथे झालेल्या लिलावात, महान भारतीय चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या 'अनटाइटल्ड' (Untitled) या चित्राने एक नवा विक्रम प्रस्थापित करून इतिहास रचला आहे. हे आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महागडे भारतीय आधुनिक कला चित्र बनले आहे. खरं तर, हे पेटिंग न्यू यॉर्कमधील क्रिस्टीच्या लिलाव गृहाने 13.8 दशलक्ष डॉलर (सुमारे 118 कोटी रुपये) मध्ये विकले, जे आतापर्यंतच्या लिलावातील सर्वाधिक किंमत आहे. या विक्रीने अमृता शेरगिलचा जुना विक्रम मोडला आहे. या पेंटिंगमध्ये असे काय खास आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेऊयात... 

एम.एफ. हुसेन यांच्या चित्रात काय खास आहे?

या चित्र 1954 मध्ये बनवण्यात आले होते. या चित्रात 'ग्राम यात्रा' तयार केली आहे. हे चित्र सुमारे 14 फूट लांब आहे आणि 13 पॅनल्सपासून बनलेले आहे. हे चित्र स्वतंत्र भारताच्या विविधतेचे आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण करते. या चित्रात एक पुरूष आणि एक महिला बैलगाडीवर बसलेली दाखवले आहे. याशिवाय, काही महिला गायींचे दूध काढताना, धान्य दळताना आणि मुलांची काळजी घेताना दिसत आहेत. या पेंटिंगमध्ये 13 वेगवेगळे दृश्ये दाखवण्यात आली आहेत. 70 वर्षांनंतर, हे चित्र पहिल्यांदाच सार्वजनिक लिलावासाठी आले आहे. या चित्राद्वारे हुसेन यांनी भारतीय ग्रामीण जीवन आणि स्वातंत्र्यानंतरचे त्याचे महत्त्व चित्रित केले आहे.

हेही वाचा - 'मला दररोज ऑफिसला येणं परवडत नाही!' वाढत्या महागाईवर लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणीने व्यक्त केली नाराजी

चित्राला मिळाली चार पट किंमत  - 

या पेंटिंगची सुरुवातीची किंमत 25 लाख ते 35 लाख डॉलर दरम्यान असण्याचा अंदाज होता, परंतु ती अपेक्षेपेक्षा चार पटीने विकली गेली. यापूर्वी, हुसेन यांचे सर्वात महागडे चित्र जे सप्टेंबर 2023 मध्ये लंडनमधील सोथेबीज लिलावगृहात सुमारे 26 कोटी रुपयांमध्ये विकले गेले.

हेही वाचा - काय सांगता!! 10 दिवस अंथरुणावर पडून राहिल्यास तुम्हाला मिळतील 4.75 लाख रुपये! 'ही' कंपनी देत आहे खास ऑफर

अमृता शेरगिलचा विक्रम मोडला - 

या लिलावाने भारतीय कलेच्या जगात एक नवा इतिहास रचला. यापूर्वी, सर्वात महागड्या भारतीय कलाकृतीचा विक्रम अमृता शेरगिल यांच्या 'द स्टोरी टेलर' या चित्राच्या नावावर होता, जे सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत 7.4 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 63 कोटी रुपये) मध्ये विकले गेले होते.