बकरी ईदला 'हा' देश देणार नाही प्राण्यांची कुर्बानी; भारतासह जगभरातील मुस्लिम देशांना मोठा संदेश
मोरोक्को: भारतासह जगभरात 7 जून रोजी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. बकरी ईदनिमित्त जगभरातील मुस्लिमांना मोठा संदेश देत, एका इस्लामिक देशाने कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा देश दुसरा तिसरा कोणी नसून मोरोक्को आहे. मोरोक्को प्रशासनाने ईद-उल-अजहापूर्वी मोरोक्कोमधील पशु बाजार बंद केले आहेत. यासोबतच, बकरीसह इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
मोरोक्कोमध्ये बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी रद्द -
ईद-उल-अजहापूर्वी पारंपारिक प्राण्यांची कुर्बानी न करण्याची सूचना देण्यात आली आहे. यानंतर, मोरोक्को प्रशासनाने देशभरातील पशु बाजार बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. घटत्या पशुधनाच्या संख्येचे संरक्षण करण्यासाठी मोरोक्को सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजा मोहम्मद सहाव्या यांनी जारी केलेल्या निर्णयानुसार यावर्षी पारंपारिक प्राण्यांची कुर्बानी रद्द करण्यात आली आहे. देशात सुरू असलेल्या दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणे उद्ध्वस्त केली होती! पाकिस्तानच्या कागदपत्रात मोठा खुलासा
प्राण्यांचा बळी थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश -
दरम्यान, प्राण्यांचा बळी थांबवण्यासाठी मोरोक्को प्रशासनाने देशभरातील स्थानिक अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. त्यांना या बंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. ईदपूर्वी सहसा सुरू असलेल्या सार्वजनिक आणि हंगामी पशु बाजार बंद करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
हेही वाचा - पाकिस्तानातील 17 वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या
लोकांना पारंपारिक कुर्बानीपासून दूर राहण्याचे आवाहन -
तथापि, प्राण्यांच्या संरक्षणासाठी राजा मोहम्मद सहावा यांनी जगभरातील मुस्लिमांना एक प्रकारचा संदेश दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, राजाने मोरोक्कन नागरिकांना पारंपारिक कुर्बानीपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते.