'माझा नियोजित वेळ संपत आलाय...'; ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडले एलोन मस्क!
वॉशिंग्टन: टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनापासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. त्यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. अलिकडेच एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल' कर विधेयकावर उघडपणे टीका केली, त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.
एलोन मस्कने मानवे ट्रम्प यांचे आभार -
एलोन मस्क यांनी एक्सवर लिहिले की, विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा नियोजित वेळ संपत आहे, मी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी वाया घालवणारा खर्च कमी करण्याची संधी दिली. DOGE मिशन कालांतराने अधिक मजबूत होईल कारण ते सरकारमधील जीवनशैली बनेल.
हेही वाचा - मोठा खुलासा! असीम मुनीरचं होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड?
निवडणूक प्रचारात मस्क यांचा ट्रम्पला पाठिंबा -
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ट्रम्प आणि मस्क यांच्या दोघांमध्ये चांगले संबंध होते. मस्क यांनी ट्रम्प प्रशासनात वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी मस्क यांनी 250 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले होते.
हेही वाचा - स्पेसएक्सच्या 'Starship' रॉकेटचे प्रक्षेपण पुन्हा अयशस्वी; अंतराळयानाचे झाले तुकडे
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाची स्थापना केली, ज्याची जबाबदारी मस्क यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हा विभाग सरकारी खर्च कमी करण्यासाठी काम करत आहे.