भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थरकाप! लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदावरून हटवले?
इस्लामाबाद: भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुखांना हटवल्याचे वृत्त आहे. असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. असीम मुनीरवर त्यांचा वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे. सय्यद असीम मुनीर अहमद शाह हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते आणि ते सतत भारताविरुद्ध विष ओकत होते. 2022 पासून ते पाकिस्तानी लष्कराचे 11 वे लष्करप्रमुख म्हणून काम पाहत होते. लष्करप्रमुख होण्यापूर्वी ते GHQ मध्ये क्वार्टरमास्टर जनरल म्हणून तैनात होते.
पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुखांची नियुक्ती साधारणपणे 3 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. त्यानुसार, असीम मुनीर यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार होता परंतु कायद्यात बदल करून तो 3वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. यानंतर, असीम मुनीर यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2027 पर्यंत होता. परंतु बातम्यांनुसार, आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाकिस्तानला आता नवीन लष्करप्रमुख मिळू शकतो.
हेही वाचा - 'पाकिस्तानात दहशतवाद्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची पद्धत असू शकते;' भारताची फटकार
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये राजकीय आणि लष्करी अस्थिरता वाढली आहे. पाकिस्तानी सैन्यात असंतोषाचे वृत्त आहे आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असीम मुनीर यांच्या जागी लेफ्टनंट जनरल शाहिद इम्रान मिर्झा यांच्याकडे पाकिस्तानी सैन्याची कमान सोपवण्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे.
हेही वाचा - INS विक्रांतने मोडले पाकिस्तानचे कंबरडे! कराचीसह अनेक शहरांमध्ये हल्ले
दरम्यान, बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात बलुच बंडखोरांनी पाकिस्तानच्या सुरक्षा चौक्यांवर भीषण हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. अलिकडच्या लष्करी अपयशानंतर आणि भारताने केलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर, जनरल मुनीर यांच्या रणनीतीवर पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. भारताने कराची बंदरावर केलेल्या प्राणघातक हवाई हल्ले आणि समुद्री हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यात नेतृत्व बदलाची मागणी जोर धरत आहे.