Russia Ukraine War: युक्रेनमधील सुमी येथे रशियाचा विनाशकारी हल्ला! बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने 21 जणांचा मृत्यू
Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. रशियाने युक्रेनमधील सुमीवर धोकादायक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे, ज्यामुळे सुमीमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. या हल्ल्यात किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रशियन क्षेपणास्त्रांनी शहरातील रस्ते, सामान्य जीवन - निवासी इमारती, शैक्षणिक संस्था, रस्त्यावरील गाड्या यांना लक्ष्य केले आहे. रविवारी लोक चर्चमध्ये जात असताना हा हल्ला झाला. अभियोक्ता जनरल कार्यालयाने सुरुवातीच्या तपास निकालांचा हवाला देत म्हटले आहे की, शत्रूच्या हल्ल्यात किमान 21 लोक ठार झाले आणि 34 जण जखमी झाले, ज्यात पाच मुले आहेत.
दरम्यान, हा हल्ला रशिया-युक्रेन युद्धातील एक नवीन अध्याय मानला जात आहे, त्यानंतर हे युद्ध अधिक धोकादायक रूप धारण करू शकते. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून सर्व अत्यावश्यक सेवा घटनास्थळी काम करत आहेत.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पाऊल मागे, टॅरिफच्या यादीतून 'या' वस्तू वगळल्या
तथापी, झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगाने जोरदार प्रतिसाद दिला पाहिजे. अमेरिका, युरोप, जगात ज्यांना हे युद्ध आणि हे हत्याकांड संपवायचे आहे. रशियाला नेमका हाच दहशतवाद हवा आहे आणि तो हे युद्ध पुढे ढकलत आहे. रशियावर दबाव आणल्याशिवाय शांतता अशक्य आहे.
हेही वाचा - Tahawwur Rana NIA Custody: तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी
सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये क्षेपणास्त्रामुळे झालेले प्रचंड नुकसान स्पष्टपणे दिसून येत आगे. ज्यामध्ये अनेक वाहनांचे आणि नागरी इमारतींचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे गेल्या महिन्यात सौदी अरेबियात झालेल्या बैठकीत सकारात्मक निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या युद्धबंदी चर्चेला धक्का बसला आहे.