सौदी अरेबियाने 'हज यात्रा 2025' साठी नवीन कठोर व्ह

Hajj 2025 : हज यात्रेत लहान मुलांवर बंदी, व्हिसाचे नियम कडक, नवीन पेमेंट सिस्टम - सौदी अरेबिया

रियाध : सौदी अरेबिया सरकारने यावर्षी 2025 च्या हज यात्रेपूर्वी नियम कडक केले आहेत. सौदीने व्हिसा नियमांसह अनेक नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे हज करू इच्छिणाऱ्या जगभरातील मुस्लिमांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. सौदी अरेबियाने हज यात्रेकरूंसोबत लहान मुलांना येण्यास बंदी घातली आहे. पेमेंट पद्धती बदलल्या आहेत आणि १४ देशांमधील प्रवाशांसाठी सिंगल-एंट्री व्हिसा सुरू केला आहे. या बदलांमुळे हज यात्रेच्या जुन्या परंपरा संपुष्टात आल्या आहेत, ज्यामुळे अनेक लोक हजला जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत.

ठळक मुद्दे

  • सौदी अरेबियाने 2025 च्या हज यात्रेसाठी नियम कडक केले आहेत.
  • लहान मुलांना हजमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्याचा निर्णय
  • भारतासह 14 देशांसाठी सिंगल एंट्री व्हिसा

सौदी सरकार हज यात्रेला कठीण का करत आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव लहान मुलांना हजमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सौदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यामुळे आपल्या मुलांसह मक्केला येऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांचे हजचे स्वप्न भंग होऊ शकते. सौदी अरेबियानेही कडक व्हिसा निर्बंध जाहीर केले आहेत. भारतासह 14 देशांतील प्रवाशांना आता फक्त एकेरी प्रवेश व्हिसा मिळेल. अनधिकृत हज यात्रा थांबवण्याचा प्रयत्न हे पाऊल उचलण्यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. सौदी सरकारने एक नवीन पेमेंट सिस्टम देखील सुरू केली आहे. याअंतर्गत, यात्रेकरूंना अनेक हप्त्यांमध्ये पैसे भरावे लागतील. जर, त्यांनी असे केले नाही तर, त्यांचा हज प्रवास धोक्यात येऊ शकतो.

हेही वाचा - 'गाझा' ताब्यात घेणार पण पॅलेस्टॅनींचं पुनर्वसनही करणार; ट्रम्प यांना जगभरातून कडाडून विरोध

सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान टीकेचे लक्ष्य या नवीन धोरणांच्या अंमलबजावणीमुळे, सौदी सरकार, विशेषतः क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान टीकेचे लक्ष्य बनले आहेत. अनेकजण विचारत आहेत की सौदी अरेबिया धार्मिक कर्तव्यापेक्षा महसुली उत्पन्नाला प्राधान्य देत आहे का? व्हिसा निर्बंध, पेमेंट नियम आणि लहान मुलांवर बंदी यामुळे अनेकांनी सौदी अधिकाऱ्यांवर अनावश्यक अडथळे आणल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे हज पूर्वीपेक्षा जास्त कठीण झाला आहे.

2025 च्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाच्या कठोर धोरणामुळे व्हिसा-मुक्त प्रवास आणि धार्मिक पर्यटनाच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अनेकांना भीती आहे की हे नवीन नियम इतर देशांनाही असेच करण्यास प्रेरित करू शकतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अतिरिक्त निर्बंध येऊ शकतात. व्हिसा-मुक्त प्रवासावरील कडक कारवाई भविष्यात जगभरातील व्हिसा नियम कडक करण्याच्या दृष्टीने एक उदाहरण बनू शकते.

हेही वाचा - अमेरिकेत 'या' खेळाडूंना महिलांच्या सामन्यांत खेळता येणार नाही; ट्रम्प सरकारचा निर्णय

एकीकडे या सौदी नियमांवर टीका होत आहे. तर, दुसरीकडे अनेक लोकांनी त्यांचे समर्थनही केले आहे. गेल्या वर्षी 'Hajj 2024'मध्ये सौदी अरेबियात हज दरम्यान उष्णतेमुळे 1 हजार 300 हून अधिक मृत्यू झाले होते. परवानगी घेतल्याशिवाय हजला गेलेले लोक याचे कारण असल्याचे मानले जात होते. तेव्हा, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून हे प्रयत्न करत आहोत अशी भूमिका सौदीकडून मांडण्यात येत आहे.