अनेकदा आपण लहान मुलांच्या हातात विविध बाहुल्या पाह

MOST HAUNTED DOLLS: 'या' आहेत जगातील सर्वात झपाटलेल्या बाहुल्या

नवी दिल्ली: अनेकदा आपण लहान मुलांच्या हातात विविध बाहुल्या पाहतो. विशेषतः मुलींच्या हातात बार्बी डॉलची बाहुली. मात्र, जगात काही अशा देखील बाहुल्या आहेत, ज्या त्यांच्या भयानक आणि विचित्र हालचालींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. काहींच्या मते, जर तुम्ही चुकूनही या बाहुल्यांसमोर त्यांची मस्करी केली, तर बाहेर पडताच तुमचा अपघात होऊ शकतो किंवा तुम्ही मृत्यूच्या दारी प्रवेश करू शकता. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

1. रॉबर्ट द डॉल

jai maharashtra news

माहितीनुसार, जगातील सर्वात झपाटलेली बाहुली म्हणून रॉबर्ट द डॉल ओळखली जाते. सध्या, ही बाहुली फ्लोरिडा येथील ईस्ट मार्टेलो संग्रहालयात आहे. संग्रहालयातील अभ्यागतांच्या मते, जर कोणी या बाहुलीचा अपमान केला किंवा थट्टा केली, तर रॉबर्ट द डॉल नावाची ही बाहुली प्रचंड आक्रमक होते आणि संग्रहालयातून बाहेर पडताच त्या व्यक्तीचा अपघात होतो किंवा मृत्यूला सामोरे जातात. इतकच नाही, तर, परवानगीशिवाय या बाहुलीचा फोटो काढल्याने या बाहुलीला राग अनावर होतो. 1904 मध्ये फ्लोरिडा येथील कलाकार रॉबर्ट यूजीन ओटो यांचे वाढदिवस असल्याने त्यांना रॉबर्ट द डॉल नावाची ही बाहुली देण्यात आली होती. जेव्हा त्यांचे आजोबा जर्मनीच्या सहलीवर गेले होते, तेव्हा त्यांनी या बाहुलीला विकत घेतले होते.

2. ओकिकू बाहुली

jai maharashtra news

मान्यतेनुसार, या रहस्य बाहुलीमध्ये एका लहान मुलीची आत्मा वास्तव्य करते. गेल्या अनेक दशकांपासून या बाहुलीने जपानमधील लोकांची उत्सुकता वाढवली आहे. ही बाहुली 1938 पासून इवामिझावा (होक्काइडो प्रीफेक्चर) शहरातील मानेनजी मंदिरात आहे. काहींच्या मते, सुरुवातीला या पारंपरिक दिसणाऱ्या बाहुलीचे केस लहान होते. मात्र, कालांतराने तिचे केस गुडघ्यांपर्यंत वाढले आहे. 

3. मर्सी बाहुली

jai maharashtra news

'ही बाहुली 18 इंच उंच आहे आणि तिची भीती मोजता येत नाही', असे खऱ्या झपाटलेल्या बाहुलीची मालकीण शेरींची प्रतिक्रिया आहे. 'जेव्हा 7 वर्षांच्या एका मुलीने ही बाहुली इबे (eBay) विक्रेत्याकडून विकत घेतली होती, तेव्हा या बाहुलीत असलेला भयानक आत्मा तिला त्रास देऊ लागला', असं देखील बाहुलीची मालकीण शेरी म्हणाली. शेरी ही एक पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी एक्स्पर्ट आहे. शेरीच्या मते, 'पहिल्या रात्री मला विश्वास बसत नव्हता. मात्र, दुसऱ्या रात्री , माझ्या खोलीत अचानक रेडिओ सुरू झाला होता, पण मला आणि माझ्या पातीला याबाबत काहीच वाटले नाही. परंतु, दोन दिवसानंतर ही बाहुली तिच्या पायावर उभी राहिली होती'. 

4. अ‍ॅनाबेले बाहुली

jai maharashtra news

ही बाहुली जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. या बाहुलीच्या लोकप्रियतेमुळे काही वर्षांपूर्वी 'अ‍ॅनाबेले' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. सध्या ही बाहुली प्रसिद्ध पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी एक्स्पर्ट एड आणि लॉरेन वॉरेन यांच्या संग्रहातील विशेष काचेच्या केसमध्ये कैद आहे. वॉरेन्सच्या मते, 1970 मध्ये अ‍ॅनाबेले नावाची ही बाहुली डोना नावाच्या एका तरुण नर्सिंग विद्यार्थिनीला तिच्या आईने दिली होती. ही बाहुली, डोना आणि तिची रूममेट अँजी यांच्या घरात असे. त्यांच्या गैरहजेरीत ही बाहुली अपार्टमेंटमध्ये फिरत असे. मात्र, काही दिवसातच परिस्थिती हाताबाहेर गेली. या बाहुलीने मदतीसाठी चिठ्ठ्या टाकण्यास सुरुवात केली. यानंतर, या बाहुलीने अँजीच्या प्रियकरावर हल्ला केला. जेव्हा, या दोघींना अ‍ॅनाबेले बाहुलीच्या कपड्यांवर रक्त दिसले, तेव्हा त्यांनी एका मनोविकारतज्ज्ञाला बोलावले. बाहुलीची तपासणी केल्यानंतर मनोविकारतज्ज्ञाने खुलासा केला की या बाहुलीत अ‍ॅनाबेल नावाच्या मुलीचा आत्मा आहे. जी प्रचंड शक्तिशाली आहे.