कंपनीच्या या पॉलिसीअंतर्गत, कर्मचाऱ्यांना दोन मिनि

'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांना वॉशरूमला जाण्यासाठी घ्यावी लागेल HR कडून परवानगी! काय आहे Toilet Break Policy? जाणून घ्या

Toilet

Toilet Break Policy: प्रत्येक कंपनीची स्वतःची पॉलिसी असते, जी त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना पाळावी लागते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा कंपनीच्या धोरणाबद्दल सांगणार आहोत ज्याचे नियम खूप विचित्र आहेत. कंपनीच्या या नियमामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चीनमध्ये थ्री ब्रदर्स मशीन मॅन्युफॅक्चरिंग नावाची एक कंपनी आहे. या कंपनीने एक विचित्र पॉलिसी बनवली आहे. थ्री ब्रदर्स मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने टॉयलेट वापर व्यवस्थापन नियम नावाचा हा नवीन नियम लागू केला आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा नियम बनवण्यात आल्याचा दावा कंपनी करत आहे. 

विशिष्ट वेळेतचं घ्यावा लागेल टॉयलेट ब्रेक -  

कंपनीच्या या पॉलिसीअंतर्गत, कर्मचाऱ्यांना दोन मिनिटांचा शौचालयाचा ब्रेक घ्यावा लागेल आणि त्यांना विशिष्ट वेळेतच टॉयलेट ब्रेकला जाण्यास सांगितले जाईल. कंपनीचे कर्मचारी सकाळी 10:30 ते 10:40, दुपारी 3:30 ते 3:40 आणि संध्याकाळी 5:30 ते 6:00 या वेळेतच शौचालयाचा वापर करू शकतात. ओव्हरटाईम शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री 9 नंतर शौचालय वापरण्याची परवानगी आहे.

हेही वाचा -  World Record : हे आहेत 100 हून अधिक नातवंडे असलेले आजी-आजोबा! ब्राझीलच्या जोडप्याचा वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम

नियम मोडणाऱ्यांकडून आकारण्यात येणार 1200 रुपये - 

विशेष म्हणजे कर्मचारी या नियमांचे पालन करतात की, नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीने कॅमेरे बसवले आहेत. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास, कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 100 युआन (सुमारे 1200 रुपये) कापून घेईल.

जास्त वेळ हवा असल्यास HR कडून घ्यावी लागेल मंजुरी - 

एखाद्याला कर्मचाऱ्याला जर जास्त वेळ हवा असेल तर त्याला HR कडून परवानगी घ्यावी लागेल. ज्या कर्मचाऱ्यांना दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागेल त्यांना एचआरशी संपर्क साधून मंजुरी घेण्यास सांगण्यात आले आहे. मर्यादित वेळेत विशेष शारीरिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या गरजांमुळेच त्यांना ही मंजुरी मिळेल. 

हेही वाचा -  चंद्रावर मोठा स्फोट होणार? 2024 YR4 लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचा एक तुकडा चंद्रावरही आदळणार

या कंपनीच्या नियमाचे पालन 11 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. हे नियम 1 मार्चपासून अधिकृतपणे लागू करण्याची योजना होती. पण या नियमांवर टीका झाल्यानंतर कंपनीने 13 फेब्रुवारी रोजी ते रद्द केले. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने या प्रकरणाची पुष्टी केली आहे.