भारताने अमेरिकेचे अत्याधुनिक F-35 स्टेल्थ लढाऊ विम

ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि संरक्षण करारांच्या पार्श्वभूमीवर सध्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. तसेच दुसऱ्या बाजूला भारताने अमेरिकेचे अत्याधुनिक F-35 स्टेल्थ लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला आहे. ही घटना दोन्ही देशांमधील वाढता तणाव अधोरेखित करते. 

ब्लूमबर्गने आपल्या अहवालात अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, अमेरिकन उत्पादनांच्या खरेदीला गती देण्याचा विचार करूनही, भारत सरकार अमेरिकेकडून अतिरिक्त संरक्षण उत्पादने खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारताने अमेरिकेला कळवले आहे की, त्यांना F-35 स्टेल्थ लढाऊ विमान खरेदी करण्यात रस नाही.

हेही वाचा - Trump Strikes Again: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने कोसळले आशियाई बाजार; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

भारताने F-35 विमान खरेदी करण्यास दिला नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या दरम्यान ट्रम्प यांनी भारताला F-35 लढाऊ विमान विकण्याची ऑफर दिली. अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की भारत सरकार संरक्षण उपकरणांच्या देशांतर्गत संयुक्त डिझाइन आणि उत्पादनावर केंद्रित भागीदारीमध्ये अधिक रस घेत आहे. तथापी, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा - अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लागू; टॅरिफचा शेतकऱ्यांना मोठा फटका

भारताची भूमिका -

भारत सरकारने ट्रम्प यांच्या शुल्क घोषणेनंतर लगेचच प्रतिक्रिया दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सांगितले की, भारत सरकार या निर्णयाचे गंभीरपणे मूल्यांकन करत आहे. राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील. सरकार सर्व भागधारकांच्या, विशेषतः शेतकरी, उद्योगपती, निर्यातदार, एमएसएमई आणि कामगारांच्या हिताचे संरक्षण करेल.