Pakistan Train Hijack Video: पाकिस्तानमधील हायजॅक केलेल्या ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल; BLA ने प्रवाशांना कसं ओलीस ठेवलं, पहा
Pakistan Train Hijack Video: पाकिस्तानमधील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने केलेल्या ट्रेन अपहरणाचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, बीएलएने प्रवाशांसह संपूर्ण पाकिस्तानी ट्रेन कशी ओलीस ठेवली हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनच्या बाजूला स्फोट होताना दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंत ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली आहे. सध्या अपहरणकर्त्यांना सोडण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.
तथापि, पाकिस्तानी सैन्याने दावा केला होता की, त्यांनी 16 बीएलए दहशतवाद्यांना मारून या ओलिस ठेवलेल्यांची सुटका केली आहे. पण जाफर एक्सप्रेसच्या सुटका केलेल्या प्रवाशांनी पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला आहे. अनेक प्रवाशांनी सांगितले की, त्यांना पाकिस्तानी सैन्याने वाचवले नाही तर बीएलएनेच सोडून दिले.
हेही वाचा - Pakistan Train Hijack: पाकिस्तानी सैन्याला मोठे यश, 104 ओलिसांची सुटका, 16 दहशतवादी ठार
पाकिस्तान हायजॅक केलेल्या ट्रेनचा व्हिडिओ -
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे, जो स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाही. 1947 मध्ये पाकिस्तानने ते जबरदस्तीने तो पाकिस्तानमध्ये विलीन केला. तेव्हापासून पाकिस्तान बलुचिस्तानवर आपला अधिकार असल्याचा दावा करतो. पाकिस्तान स्वतः तिथल्या संपत्तीचा वापर करत आहे. तसेच पाकिस्तानने येथील खाणकामाचे अधिकारही चीनला दिले आहेत. यामुळे बलुचिस्तानमधील रहिवासी चीन आणि पाकिस्तान दोघांवरही नाराज आहेत.
क्वेट्टाला जाणारी रेल्वे सेवा बंद -
दरम्यान, पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस ट्रेन अजूनही बलुच बंडखोरांच्या ताब्यात आहे. अद्याप, 100 हून अधिक ओलिस अजूनही बलुच आर्मीच्या ताब्यात आहेत. रेल्वे अपहरणाच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तान सरकारने क्वेट्टाला जाणारी रेल्वे सेवा बंद केली आहे.