नोएडाच्या सेक्टर 137 येथील पारस टिएरा सोसायटीमधील ब्लिप्पी या डे केअर सेंटरमधून एक प्रकरण समोर आले आहे. आई मुलाला डे केअरमधून परत घेऊन गेली तेव्हा बाळ सतत रडत होते. आईने तपासणी केली तेव्हा तिला मुलीच्या मांड्यांवर चावा घेतल्याच्या खुणा दिसल्या. त्यानंतर आईने ताबडतोब चिमुकलीला रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांना दाखवले. चिमुकलीची तपासणी केली तेव्हा मांड्या दातांनी चावल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
व्हिडीओ आला समोर :
यानंतर, आईला डे केअरमधील मोलकरीणावर संशय आला. चिमुकलीची आई डे केअरमध्ये पोहोचली आणि तिला सीसीटीव्ही तपासण्यास सांगितले गेले, परंतु डे केअरच्या प्रमुखाने सुरुवातीला कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली आणि त्यात मोलकरीण मुलीवर अत्याचार करताना स्पष्टपणे दिसून आली. व्हिडिओमध्ये ती मुलीला मारताना आणि तिला जमिनीवर फेकताना दिसत आहे.
दातांनी चावा, प्लास्टिकच्या पट्ट्याने मारहाण
एवढेच नाही तर डे केअरमध्ये मुलीला प्लास्टिकच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली आणि तिच्या मांडीलाही दातांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. आईने आरोपी मोलकरणी आणि डे केअरविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिलेच्या तक्रारीवरून, सेक्टर-142 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आणि आरोपी मोलकरणीलाही अटक करण्यात आली. डे-केअर ब्लिपीचे प्रमुख ऋषी अरोरा यांच्या पत्नी चारूविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.