Wednesday, August 20, 2025 04:32:05 AM

नवऱ्याला मारण्यासाठी पत्नीने You Tube वरून घेतले धडे! प्रियकराच्या मदतीने पतीच्या कानात कीटकनाशक टाकून केली हत्या

महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची अमानुषपणे हत्या केली. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीच्या कानात कीटकनाशक टाकले, ज्यामुळे पतीचा मृत्यू झाला.

नवऱ्याला मारण्यासाठी पत्नीने you tube वरून घेतले धडे प्रियकराच्या मदतीने पतीच्या कानात कीटकनाशक टाकून केली हत्या

करीमनगर: तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रमादेवी नावाच्या विवाहित महिलेने युट्यूबवरून आपल्या पतीला ठार मारण्याची युक्ती शोधली. महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची अमानुषपणे हत्या केली. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीच्या कानात कीटकनाशक टाकले, ज्यामुळे पतीचा मृत्यू झाला. परंतु मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना संशय आला, त्यानंतर त्यांनी काटेकोरपणे चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 

काय आहे नेमकं प्रकरण?

रमादेवी नावाची एक विवाहित महिला तेलंगणातील प्रसिद्ध पदार्थ सर्वपिंडी विकत असे. या काळात राजैया नावाचा एक व्यक्ती तिच्या गाडीवर सर्वपिंडी खरेदी करण्यासाठी दररोज येत असे. हळूहळू रमादेवी आणि राजैया यांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर दोघांमधील प्रेमसंबंध वाढले. परंतु, रमादेवीचा पती संपतला याची कल्पना आली. यानंतर, रमादेवीने तिचा प्रियकर राजैयासोबत तिचा पती संपतची हत्या करण्याचा कट रचला. पण रमादेवीला वाटले की यापूर्वी ज्या सर्व पत्नींनी खून केला आहे त्या पकडल्या गेल्या आहेत. कारण खून प्रकरणात वापरलेली शस्त्रे जप्त केली जातात. अशा परिस्थितीत रमादेवीने हत्येचा एक नवीन मार्ग शोधला.

हेही वाचा - ठाणे पोलिसांची गँगस्टर टोळीवर कारवाई; लॉरेन्स बिश्नोई गटाशी संबंधित 7 गुंड गजाआड

यूट्यूबवर शोधला हत्येचे मार्ग  - 

दरम्यान, रमादेवीने यूट्यूबवर पतीच्या हत्येचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तिला समजले की, जर एखाद्या व्यक्तीच्या कानात गवतावर टाकण्याचे औषध (कीटकनाशक) घातले तर तो व्यक्ती मरतो. त्यानंतर रमादेवीने तिच्या प्रियकराला ही पद्धत वापरण्याचा सल्ला दिला. 

हेही वाचा - कोर्टाच्या इमारतीत संशयास्पद प्रकार, खिळा ठोकलेला लिंबू आढळला; जादूटोण्याची शक्यता

आरोपींकडून गुन्ह्याची कबूली - 

रमादेवीचा प्रियकर राजैयाने संपतला एका पार्टीला बोलावले. संपत दारू पिऊन मद्यधुंद झाल्यावर राजैयाने त्याच्या कानात कीटकनाशक टाकले. त्यानंतर काही वेळातच संपतचा मृत्यू झाला. हत्येनंतर रमादेवीने पोलिसांकडे पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. परंतु, मृतदेह सापडताच तिने पोलिसांना स्वतःच माहिती दिली आणि तिथेच तिचा कट उघडकीस आला. या संशयावरून पोलिसांनी रमादेवी आणि राजैयाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला. हे प्रकरण सध्या संपूर्ण तेलंगणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


सम्बन्धित सामग्री