मुंबई: अभिनेत्री लीना चंदावरकर 1970- 80 च्या दशकातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशस्वी चित्रपटांमुळे तसेच आयुष्यातील काही दुखद प्रसंगांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील धारवाड येथे झाला. लीना या एका कोकणी मराठी कुटुंबात वाढल्या. त्यांचे वडील सैन्यात होते. चित्रपटांमध्ये करिअर करण्यापूर्वी लीना यांनी शालेय नाटकांमध्ये भाग घेतल्याने त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी विनोद खन्ना यांच्या विरुद्ध सुनील दत्त यांच्या 'मन का मीत' या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली. आज आपण अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्या आयुष्याती काही प्रसंगांबद्दल जाणून घेणार आहोत...
अभिनेत्री लीना चंदावरकर कोण आहेत?
लीना चंदावरकर या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नावाची एक वेगळीच छाप उमटवली आहे. त्यांनी हमजोली, हनीमून, मेहबूब की मेहंदी, मंचली, दिल का राजा, एक महल हो सपनो का, बिदाई, प्रीतम, बैराग, कैद आणि यारों का यार यासह अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा: Cheating Case: शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून लूकआउट नोटीस जारी
लीना यांंनी त्या काळातील आघाडीचे नायक जितेंद्र, राजेश खन्ना आणि विनोद खन्ना यांच्यासोबत काम केले. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे पुत्र सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर लवकरच सिद्धार्थ यांचे निधन झाले. यानंतर 1980 मध्ये, वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी पार्श्वगायक किशोर कुमार यांच्याशी लग्न केले.
लीना चंदावरकर यांचे वैयक्तिक आयुष्य
सिनेप्लॉटला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की त्यांच्या लग्नादरम्यान त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. यानंतर किशोर कुमार यांचे 1987 मध्ये निधन झाले, तेव्हा लीना चंदावरकर 37 वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्या दुसऱ्यांदा विधवा झाल्या.
29 ऑगस्ट 1950 रोजी जन्मलेल्या लीना चंदावरकर यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत 'मन का मीत' (1968) या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने जितेंद्र, राजेश खन्ना आणि विनोद खन्ना यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. 25 व्या वर्षी तिने सिद्धार्थ बांदोडकरशी लग्न केले. लग्नानंतर लगेचच दुःखद निधन झाले. यानंतर, त्यांनी 1980 मध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांच्याशी लग्न केले, परंतु 1987 मध्ये त्यांचे आकस्मिक निधनानंतर त्या पुन्हा विधवा झाल्या.