Thursday, September 18, 2025 09:49:37 PM

Hemangi Kavi: एकादशीच्या दिवशी मटण खाण्यावरुन हेमांगी कवी ट्रोल, 'एकादशीपेक्षा मला माझी आई...'; कमेंट करणाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर

हेमांगी कवीने नुकतीच मुलाखती का द्यायच्या बंद केल्या, याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, ज्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला.

hemangi kavi एकादशीच्या दिवशी मटण खाण्यावरुन हेमांगी कवी ट्रोल एकादशीपेक्षा मला माझी आई कमेंट करणाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त, बेधडक आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्री म्हणून हेमांगी कवी हिला ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हेमांगी एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यात तिने एका चाहत्याला त्याच्या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

हेमांगी कवीने नुकतीच मुलाखती का द्यायच्या बंद केल्या, याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, ज्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला. चाहत्याने लिहिलं, "मॅडम, तुमच्या कोणत्याही निर्णयावर मला बोलायचं नाही, पण एकादशीच्या दिवशी आईने मटण केलं होतं म्हणून खाल्लं, ही पोस्ट आवडली नाही. तुम्ही नक्की खा, पण सोशल मीडियावर सांगून काय उपयोग?" चाहत्याच्या या कमेंटवर हेमांगीने त्याला प्रत्युत्तर उत्तर दिलं आहे.

हेमांगीने चाहत्याला प्रत्युत्तर देताना लिहिलं, "एकादशीपेक्षा माझी आई आणि तिच्या भावना मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. माझ्यासाठी माझा देव, एकादशी, उपवास आणि शास्त्र वगैरे माझे जन्मदाते आहेत." पुढे ती म्हणाली, "तुम्हाला माझं काही आवडलं नाही, तरी मला काहीही हरकत नाही." हेमांगीच्या या उत्तरावर अनेक नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

 

हेही वाचा: Deepika Padukone Kalki 2 : 'स्पिरीट'नंतर आता 'कल्की'मधूनही दीपिका पदुकोण बाहेर, निर्मात्यांनीच केली घोषणा, कारण...

हेमांगीची पोस्ट चर्चेत
हेमांगीने पोस्टमध्ये म्हटले की, "प्रत्येक विचाणाऱ्याला वेगळं सांगण्याऐवजी एकदाच काय तो निरोप/ निर्णय सांगावासा वाटला म्हणून ही पोस्ट. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना, रसिक प्रेक्षकांना, पत्रकार मंडळींना ज्यांची स्वतःची खूप छान छान YouTube channels आहेत, news channels आहेत ज्याच्यावर येऊन मी गप्पा माराव्या, काहीतरी बोलावं, share करावं वाटतं कारण मी solid बोलते, bold बोलते असं ज्यांना वाटतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला views मिळतील असा ग्रह आहे त्यांना माझी नम्र विनंती की यापुढे project promotions व्यतिरिक्त मी कुठलीही मुलाखत, सहज गप्पा मारणे, नवरात्र special, दिवाळी special segment वगैरे यासाठी तुमच्या channel वर येऊ इच्छित नाही याची नोंद घ्यावी. कृपया कुठलाही राग मानू नये किंवा गैरसमज करून घेऊ नये. गेले दीड वर्षापासून मी हे पाळतेय आणि कदाचित म्हणूनच मधल्या वेळात कामा व्यतिरिक्त मी कुठे मुलाखत वगैरे देताना दिसले नसेन. आधी आजमावून पाहीलं जमतंय का हे आणि मग सांगायचं ठरवलं. दरम्यान मी प्रत्येक विचाणाऱ्याला kindly नकार देत होते. "

पुढे हेमांगी म्हणाली, हे मी ठरवून करते आहे. कारण मुलाखत घेणाऱ्यासकट माझाही हेतू खूप चांगला असतो, पण काही मुर्ख लोक आपल्या बोलण्याचा गैरवापर करून मस्त पैसे कमावतात. मी जे त्या मुलाखतीत, podcast मध्ये बोलले असेन त्यातले 4-5 शब्द उचलून, घाणेरडी headlines देऊन, त्याचा पुर्ण अर्थ बदलून टाकून click bait चा वापर करून त्याची बातमी करतात, videos करतात आणि मस्त पैसे कमावतात. बाकी लोक त्या headlines वाचून, पुर्ण video न ऐकता, न वाचता त्यांना उगाच views मिळवून देतात!  मला समजून घ्याल आणि माझी ही post इतर posts सारखी viral कराल अशी अपेक्षा जेणे करून माझं नकार द्यायचं काम सोपं होईल."



सम्बन्धित सामग्री