Saturday, September 06, 2025 03:59:05 AM

India’s Got Latent प्रकरणात राखी सावंतची चौकशी होणार; महाराष्ट्र सायबर सेलकडून बजावण्यात आले समन्स

सायबर सेलने अभिनेत्रीला 27 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच आशिष आणि रणवीर 24 फेब्रुवारी रोजी त्यांचे जबाब नोंदवणार आहेत.

india’s got latent प्रकरणात राखी सावंतची चौकशी होणार महाराष्ट्र सायबर सेलकडून बजावण्यात आले समन्स
Rakhi Sawant
संपादित प्रतिमा

Rakhi Sawant Summoned: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीचं चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राखी सावंतचे नाव इंडियाज गॉट लेटेंटच्या वादामुळे चर्चेत आले आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' वरून सुरू असलेल्या वादात आरोपी रणवीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा आणि समय रैना यांच्यानंतर आता महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला समन्स बजावले आहे. सायबर सेलने अभिनेत्रीला 27 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच आशिष आणि रणवीर 24 फेब्रुवारी रोजी त्यांचे जबाब नोंदवणार आहेत. तथापी, 18 फेब्रुवारी रोजी नियोजित सत्रात उपस्थित राहू न शकलेल्या YouTuber समय रैनालाही अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची विनंती नाकारल्यानंतर त्याला दुसरे समन्स जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा -  शायद समय खराब चल रहा है, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ!” – स्टेजवर अश्रू तरीही जिद्द सोडली नाही

पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वादाला तोंड फुटले, ज्यामुळे देशभरातून लोक संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये अलाहबादिया, रैना, विनोदी कलाकार अपूर्व मखीजा आणि शोच्या आयोजकांविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने अल्लाहबादिया यांच्या टिप्पण्या 'घाणेरड्या आणि विकृत' असल्याचे म्हटले. 

हेही वाचा -  'तुझ्या डोक्यात घाणच भरलीय!' – सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादियाला दणका

या वादामुळे YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवरील अनुचित सामग्रीबद्दल वाढत्या चिंतेकडे लक्ष वेधले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारला अशा प्लॅटफॉर्मच्या गैरवापरावर कारवाई करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र महिला आयोगाने न्यायालयाच्या हस्तक्षेपाचे कौतुक केले आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवर युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांनी केलेल्या अश्लील कमेंटनंतर, समय रैनाने शोचे सर्व एपिसोड युट्यूबवरून काढून टाकले होते. सर्वोच्च न्यायालयाने पॉडकास्टर आणि त्याच्या सहयोगींना पुढील सूचना मिळेपर्यंत YouTube किंवा इतर प्लॅटफॉर्मवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित करण्यास मनाई केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री