Saturday, September 06, 2025 02:42:39 AM

Cheating Case: शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून लूकआउट नोटीस जारी

या प्रकरणामुळे या जोडप्याच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले आहेत. पोलिसांच्या मते, त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांमुळे तपासात अडथळा येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

cheating case शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून लूकआउट नोटीस जारी

Lookout Notice Issued To Shilpa Shetty: मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती, उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. 60.48 कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे या जोडप्याच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले आहेत. पोलिसांच्या मते, त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांमुळे तपासात अडथळा येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 14 ऑगस्ट रोजी शिल्पा, राज आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक तक्रारदार दीपक कोठारी (60) यांनी आरोप केला की, कर्जासह गुंतवणुकीच्या योजनेंतर्गत त्यांची 60 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. कोठारी यांच्या मते, राज कुंद्राशी एका मित्रामार्फत भेट झाल्यानंतर त्यांच्या कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कडून गुंतवणुकीची ऑफर मिळाली. कंपनीकडून मासिक परतावा आणि मुद्दल परतफेडीचे आश्वासन देण्यात आले.

हेही वाचाMohammed Rafi Controversy: मंगेशकर भगिनींवर मोहम्मद रफींच्या लेकाचा गंभीर आरोप, म्हणाले 'या वयात थोडी लाज...

दरम्याान, 2015 मध्ये कोठारी यांनी दोन हप्त्यांत गुंतवणूक केली. एप्रिलमध्ये 31.95 कोटी आणि सप्टेंबरमध्ये 28.53 कोटी. मात्र, 2016 मध्ये शिल्पा शेट्टीने कंपनीचा राजीनामा दिला आणि नंतर कळले की कंपनी आधीच दिवाळखोरी प्रक्रियेत अडकली आहे. पैसे परत मागूनही ते मिळाले नाहीत. तक्रारदारांचा आरोप आहे की ही गुंतवणूक शिल्पा-राज यांनी वैयक्तिक वापरासाठी वळवली.

हेही वाचा - Mithun Chakraborty: कुणाल घोष अडचणीत; मिथुन चक्रवर्तींनी दाखल केला 100 कोटींचा मानहानी खटला

या कलमांखाली गुन्हा दाखल - 

या प्रकरणात पोलिसांनी IPC कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिक गैरवापर), 406 (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि 34 (सामान्य गुन्हेगारी हेतू) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तथापी, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी निवेदन जारी करून सांगितले की हे आरोप निराधार आणि द्वेषपूर्ण आहेत. पाटील यांच्या मते, हा इक्विटी गुंतवणुकीचा करार होता, गुन्हेगारी फसवणूक नव्हे. कंपनी नंतर आर्थिक संकटात सापडली आणि NCLT मध्ये प्रकरण चालू झाले. पाटील यांनी स्पष्ट केले की कंपनीला आधीच लिक्विडेशन ऑर्डर मिळाला असून सर्व आर्थिक कागदपत्रे पोलिसांकडे जमा केली आहेत.
 


सम्बन्धित सामग्री