#Metoo प्रकरणामुळे चर्चेत आलेली बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या नुकत्याच एका व्हिडिओने खळबळ उडवली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने स्वत:च्या घरात त्रास दिला जात असल्याचे सांगितले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरही तिने नको नको ते आरोप केले आहेत. माझ्या छळामागे नाना पाटेकर आहे. पाटेकर गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याची प्रतिक्रिया तनुश्री दत्ताने माध्यमांना दिली आहे. तनुश्रीच्या आरोपावर नानाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.