Anthem Biosciences Share Price
Edited Image
Anthem Biosciences Share Price: अँथम बायोसायन्सेस लिमिटेडच्या आयपीओने शेअर बाजारात शानदार पदार्पण केले आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 723.10 रुपये आणि एनएसईवर 723.05 रुपयांवर सूचीबद्ध झाले, जे त्यांच्या इश्यू प्राइस 570 रुपयांपेक्षा सुमारे 27% अधिक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या दिवशीच जबरदस्त कमाई केली.
3,395 कोटींचा ओएफएस इश्यू
कंपनीचा पूर्णपणे ऑफर फॉर सेल असलेला हा इश्यू 14 जुलैपासून खुला झाला होता आणि 16 जुलैला बंद झाला. अँथम बायोसायन्सेसच्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 67.42 पट सबस्क्रिप्शनसह हा इश्यू ओव्हरसब्स्क्राइब झाला.
हेही वाचा - सोशल मीडिया रील बनवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार देत आहे 'ही' उत्तम संधी
अँथम बायोसायन्सेस आयपीओ सबस्क्रिप्शन स्टेटस -
क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) कॅटेगरीला 192.80 पट सबस्क्रिप्शन मिळाले, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) सेगमेंटला 44.70 पट बोली मिळाल्या. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 5.98 पट भरला गेला. आयपीओ लाँच होण्याच्या एक दिवस आधी कंपनीने अँकर इन्व्हेस्टर्सकडून 1,016 कोटी रुपये उभारले होते.
हेही वाचा - मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून लवकरच गायब होणार; RBI गव्हर्नरने दिले 'हे' संकेत
दरम्यान, ब्रोकरेज फर्म आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे विश्लेषक नरेंद्र सोलंकी यांनी सांगितले की, ज्यांना शेअर्स वाटप झाले आहेत, त्यांनी हे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ठेवावेत. कंपनीच्या कमाईची क्षमता, उद्योगातील मार्जिन्स आणि भविष्यातील वाढ पाहता हा शेअर आकर्षक आहे.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!