Wednesday, August 20, 2025 10:39:43 AM

Gurupushyamut Yog : खरेदीसाठी उत्तम मुहुर्त! सोन्यासह अन्यही अनेक वस्तू घेण्यासाठी चांगली संधी

गुरुपुष्यामृत हा योग कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

gurupushyamut yog  खरेदीसाठी उत्तम मुहुर्त सोन्यासह अन्यही अनेक वस्तू घेण्यासाठी चांगली संधी

Gurupushyamut Yog : पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार खरेदीसाठी काही दिवस शुभ मानले जातात, मोठी खरेदी अनेकजण मुहूर्तावर करतात, त्यापैकीच एक असलेला गुरुपुष्यामृत योग लवकरच जुळून येत आहे. गुरुपुष्यामृत योगात खरेदी करणं अतिशय शुभ आणि भाग्यवान मानलं जातं. ज्यांना पुढील काही दिवसात गाडी, बंगला-फ्लॅट, प्लॉट, दागिने, शेअर अशा गोष्टी खरेदी करायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही कामाची बातमी आहे. 

खरेदीसाठी शुभ आणि दुर्मीळ असलेला गुरुपुष्यामृत योग ऑगस्टमध्ये जुळून आला आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 21 ऑगस्ट 2025 रोजी आहे. हा योग 21 ऑगस्ट रोजी सकाळी 5:53 पासून सुरू होईल आणि उशिरा रात्री 12:08 पर्यंत असेल. गुरुपुष्यामृत योग हा एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास हा योग तयार होतो. पुष्य या शब्दाचा अर्थ 'पोषण करणारा' किंवा 'शक्ती देणारा' असा होतो. पुष्य नक्षत्र हे मराठी पंचागातील सर्व 27 नक्षत्रांमध्ये सर्वात शुभ मानले जाते. 

हेही वाचा - Gold Price Today: सोन्याच्या किमतीत आठवड्याच्या सुरुवातीला मोठा बदल; जाणून घ्या आजचे ताजे दर

गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व -

गुरुपुष्यामृत हा योग कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या दिवशी केलेल्या गुंतवणुकीमुळे म्हणजे सोने, चांदी, किंवा नवीन घर आणि वाहन खरेदी केल्यास, संपत्तीत वाढ होते असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते.

हा दिवस धार्मिक विधी, जप, साधना आणि मंत्र दीक्षा घेण्यासाठी खूप उत्तम मानला जातो. गुरुपुष्यामृत योगावर गुरु मंत्र घेणे अत्यंत शुभ मानले जाते.
या दिवशी केलेल्या उपायांमुळे जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-शांती नांदते.

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नेमकं काय करावं?

- या शुभ दिवशी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी करू शकता, ज्यामुळे आपणास चांगला लाभ मिळू शकतो. 

- नवीन वस्तूंची खरेदी: सोने, चांदी, नवीन घर, वाहन किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टी कायम आपल्यासोबत राहतात, असे मानले जाते.

- नवीन कामाची सुरुवात: कोणताही नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी हा योग खूप फलदायी ठरतो. त्यामुळे तुम्हाला येत्या काही दिवसात महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायची असल्यास गुरुवारचा मुहूर्त पकडू शकता.

धार्मिक कार्य: या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करणे, दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करणे, आणि श्रीसूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा देखील करू शकता. गरजूंना दान केल्याने किंवा सामाजिक कार्य केल्याने पुण्य मिळते.

घरात स्वच्छता आणि स्वस्तिक: या दिवशी घराची विशेष स्वच्छता करून मुख्य दारावर हळद आणि गोमूत्र मिश्रणाने स्वस्तिक चिन्ह काढणे शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते. सध्या चातुर्मास सुरू असल्यानं या नक्षत्रात विवाह सोडून इतर सर्व शुभ कार्ये केली जातात, कारण हे नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते.

हेही वाचा - Pitru Paksha 2025: पितृ पक्ष कधी सुरू होईल? सर्व तिथी आणि पूजा पद्धती, जाणून घ्या.. 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री