Property Registry: भारतात दररोज हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेची खरेदी-विक्री होते. मालमत्ता व्यवहार हा एक अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंतीचा व्यवहार आहे, अशा परिस्थितीत, सरकारने मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी अनेक नियम आणि कायदे केले आहेत. कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारात नोंदणी ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. मालमत्तेची नोंदणी झाल्यानंतरच, मालमत्ता विक्रेत्याच्या नावावरून खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित केली जाते. आज आपण मालमत्तेच्या नोंदणीमध्ये कोणाला साक्षीदार बनवता येत नाही? ते जाणून घेऊयात.
मालमत्तेच्या नोंदणीसाठी 2 साक्षीदारांची आवश्यकता -
मालमत्तेच्या नोंदणीसाठी 2 साक्षीदारांची आवश्यकता असते. साक्षीदाराशिवाय कोणताही मालमत्तेचा व्यवहार करता येत नाही. संपूर्ण व्यवहारादरम्यान हे साक्षीदार उपस्थित असले पाहिजेत. मालमत्ता नोंदणीमध्ये साक्षीदारांबाबत अनेक नियम आणि कायदे आहेत.
हेही वाचा- 'या' सरकारी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर; 3 एप्रिलपासून लागू होणार नवीन दर
मालमत्तेच्या नोंदणीसाठी कोणाला साक्षीदार बनवता येत नाही -
18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मालमत्तेच्या व्यवहारात साक्षीदार बनवता येत नाही.
मालमत्ता विकणारी आणि ती खरेदी करणारी व्यक्ती यांनाही साक्षीदार बनवता येणार नाही.
ज्या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नाही त्याला साक्षीदार बनवता येत नाही. खरं तर, मालमत्तेच्या व्यवहारात, फक्त अशा व्यक्तीला साक्षीदार बनवले जाते ज्याला माहित असते की कोणत्या लोकांमध्ये, कोणत्या अटींवर आणि कोणत्या किंमतीला हा व्यवहार होत आहे.
हेही वाचा - राज्यात रेडिरेकनर दरात सरासरी 3.53% दरवाढ
तथापि, कोणत्याही मालमत्तेच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया भारतीय नोंदणी कायदा, 1908 अंतर्गत होते. या कायद्यात मालमत्तेच्या कागदपत्रांची नोंदणी, पुरावे जतन करणे, फसवणूक रोखणे आणि मालकीची हमी सुनिश्चित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी करत असाल, तेव्हा साक्षीदारासंदर्भात योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.