Mock drills प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी असूनही, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच गुरुवारी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉकड्रिल करण्याची तयारी सुरू आहे.
मॉकड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल. यासोबतच, ब्लॅकआउट आणि हल्ल्यादरम्यान वाजणाऱ्या सायरनची माहिती दिली जाईल. लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले जातील. लोकांना अफवांपासून कसे दूर राहायचे? हे देखील सांगितले जाईल. शत्रू देशाच्या प्रचाराबद्दल कसे सतर्क राहावे, याबाबतही माहिती देण्यात येणार आहे.
हेही वाचा - मोठा खुलासा! असीम मुनीरचं होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड?
युद्धासारख्या परिस्थितीत सतर्क राहण्याचे निर्देश -
दरम्यान, या राज्यांमधील रहिवाशांना युद्धासारख्या परिस्थितीत सतर्क राहण्याचे निर्देश दिले जातील. रुग्णालये, अग्निशमन केंद्रे आणि पोलिस स्टेशन यासारख्या अत्यावश्यक आपत्कालीन सेवा वगळता महत्त्वाच्या क्षेत्रांजवळ रात्री 8 वाजल्यापासून 15 मिनिटांचा नियंत्रित ब्लॅकआउट देखील केला जाईल. पूर्वीच्या मॉक ड्रिलमध्ये आश्रय कसा घ्यावा, हवाई हल्ल्यांदरम्यान स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि संकटाच्या परिस्थितीत इतरांना कशी मदत करावी याबद्दल चर्चा करण्यात आली होती. गुरुवारी होणाऱ्या सरावातही अशाच प्रकारच्या प्रोटोकॉलचे पालन होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - संपूर्ण भारतीयांना अभिमान असणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो कोणी डिझाइन केला?
हरियाणाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल -
तथापि, राज्याची आपत्कालीन तयारी वाढवण्यासाठी हरियाणा सरकार 29 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सर्व 22 जिल्ह्यांमध्ये 'ऑपरेशन शील्ड' नावाचा एक मोठा राज्यव्यापी नागरी संरक्षण सराव करणार आहे. हरियाणा सरकारने जाहीर केले आहे की, उद्या होणाऱ्या या मॉक ड्रिलचा उद्देश आपत्कालीन यंत्रणांची चाचणी घेणे, नागरी प्रशासन, संरक्षण दल आणि स्थानिक समुदायांमधील समन्वय सुधारणे आहे.