Thursday, September 04, 2025 07:00:48 AM

मतदारांच्या ईपीआयसी क्रमांकाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा

ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या राज्यांच्या मतदारांना समान EPIC क्रमांक मिळाले आहेत.

मतदारांच्या ईपीआयसी क्रमांकाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने काही समाज माध्यमावरच्या पोस्ट्स आणि माध्यमांनी मांडलेल्या निवेदनाची दखल घेतली आहे. ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या राज्यांच्या मतदारांना समान EPIC क्रमांक मिळाले आहेत. या संदर्भात, असे स्पष्टीकरण दिले आहे की काही मतदारांचे EPIC क्रमांक एकसारखे असू शकतात, मात्र समान EPIC क्रमांक असलेल्या मतदारांचे लोकसंख्या तपशील, विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रासह इतर तपशील वेगळे आहेत. EPIC क्रमांकाबाबत विचार न करता, कोणताही मतदार अन्यत्र कोठेही मतदान न करता केवळ त्याच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात जिथे त्याचे नाव मतदार यादीत नोंदवले गेले आहे अशा संबंधित मतदारसंघातील त्याच्या नियुक्त मतदान केंद्रावर मतदान करू शकतो.

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील काही मतदारांना समान EPIC क्रमांक/मालिका वाटप हे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मतदार यादीचा डेटाबेस ERONET मंचावर स्थलांतरित करण्यापूर्वी राबवल्या जाणाऱ्या विकेंद्रित आणि मॅन्युअल यंत्रणेमुळे झाले. यामुळे काही राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालये समान EPIC अल्फान्यूमरिक मालिका वापरत आहेत आणि यामुळे विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील निरनिराळ्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दुय्यम EPIC क्रमांक वाटप झाले असण्याची शक्यता बळावते.

हेही वाचा : तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज

तथापि, कोणत्याही शंका बाजूला सारण्यासाठी, आयोगाने नोंदणीकृत मतदारांना एकमेव अशा EPIC क्रमांकाचे वाटप सुनिश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुय्यम EPIC क्रमांकाचे कोणतेही प्रकरण एकमेव असा EPIC क्रमांक देऊन दुरुस्त केले जाईल. या प्रक्रियेत मदत आणि सहाय्य करण्यासाठी ERONET 2.0 मंच अद्ययावत केला जाईल.

 


सम्बन्धित सामग्री