Air Chief Marshal AP Singh
नवी दिल्ली: भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या मोहिमेदरम्यान पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना युद्धबंदी करावी लागली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक विमान पाडले, तर 2 कमांड सेंटर, 6 रडार आणि 3 हँगर नष्ट केले. एपी सिंग यांच्या मते, या मोहिमेत एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली 'गेम चेंजर' ठरली. त्यांनी सांगितले की भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानच्या हल्ल्यांना रोखले आणि त्यांची रडार प्रणाली उद्ध्वस्त केली. या मोहिमेत ड्रोन प्रणालीचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - ''देशाने त्यांचा बालिशपणा पाहिला आहे''; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
बहावलपूर आणि मुरीदकेवर अचूक हल्ले
एअर चीफ मार्शल यांनी बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मुख्यालयावरील हल्ल्याचे उपग्रह तसेच स्थानिक माध्यमातील फोटो सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील इमारती पूर्णपणे सुरक्षित राहिल्या, तर फक्त जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले. मार्शल एपी सिंग म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे एक प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्ती होती. आम्हाला अतिशय स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
हेही वाचा - ''सर्जिकल स्ट्राईक ते ऑपरेशन सिंदूर''; मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
आमच्यावर कोणतेही बंधने लादण्यात आली नव्हती. जर काही अडथळे असतील तर ते स्वतः तयार केले होते. आम्ही किती पुढे जायचे हे ठरवले. आम्हाला योजना आखण्याचे आणि अंमलात आणण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. आमचे हल्ले विचारपूर्वक केले गेले. या काळात तिन्ही सैन्यांमध्ये उत्तम समन्वय होता, असंही मार्शल एपी सिंग यांनी नमूद केलं.